संत रविदास बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने तक्षशिला बुद्ध विहारातील तत्मणेर संघाच्या फेरीचे फुल उधळण करून स्वागत

चिंचवड (pragatbharat.com): म्हाळसाकात चौक, प्राधिकरण दि. 30/5/2024 तक्षशिला बुद्धविहार निगडी बुद्धविहारातील श्रामणेर संघाची संक्रमण फेरी बाबत.संत रविदास बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने तक्षशिला बुद्ध विहारातील तत्मणेर संघाच्या फेरीचे फुल उधळण करून स्वागत करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सातपुते यांनी स्वागत केले. श्रामणेर संघाला चहा व बिस्किट देऊन व फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. त्याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे होते. मा. प्रकाश नाईक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुदाम कांबळे यांच्या हस्ते संत रविदास महाराज याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याठिकाणी प्रमुख पाहुणे श्रामणेर असोशिएशन चे अध्यक्ष प्रकाश नाई, डी.डी. भोसले, राजु बगाडे, प्रताप सोनवणे, अध्यक्ष वहीपेन वितरण समिती, तक्षशिल मित्र संघ, आशा बैसाने उपकार्य अध्यक्षा तक्षशिला मैत्री संघ यावेळी असे मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे बाळासाहेब सातपुते यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Related posts