Railway Booking Platform IRCTC App Down Special Report Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


IRCTC Down Special Report : आयआरसीटीसी साडे दहा तास बंद, तिकीट बूकिंगसाठी प्रवाशांना अडचणी

आयआरसीटीसीच्या सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळं देशभरातील रेल्वे तिकीट आरक्षण यंत्रणा आज तब्बल अकरा तास ठप्प पडली होती. त्यामुळं आयआरसीटीसीच्या अॅप आणि संकेतस्थळावरून रेल्वे तिकीटांचं आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणीना तोंड द्यावं लागलं. आयआरसीटीच्या सर्व्हरमध्ये आज पहाटे साडेतीन वाजल्यापासून तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत आयआरसीटीसीच्या अॅप आणि संकेतस्थळावरून तिकीट आरक्षणाची व्यवस्था कोलमडली होती. मुंबईतल्या लोकलच्या प्रवाशांनाही या बिघाडाचा मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वेच्या यूटीएस अॅपवरून किंवा स्थानकावरच्या एटीव्हीएम मशिनवरूनही तिकीट काढता येत नव्हतं. त्यामुळं विविध रेल्वे स्थानकांवर मेल, एक्स्प्रेस आणि लोकल प्रवासाचं तिकीट काढण्यासाठीही प्रचंड गर्दी झाली होती. परिणामी प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीनं ऑफलाईन आरक्षणासाठी अतिरिक्त तिकीट खिडकी सुरु करण्यात आली होती.

[ad_2]

Related posts