Chhattisgarh Naxal Encounter 29 Maoists killed in major anti-Naxal operation in Chhattisgarh’s Kanker

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये DRG आणि BSF आणि माओवाद्यांच्या संयुक्त दलामध्ये चकमक झालीये. या चकमकीत सुरुवातीला 18 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती होती. मात्र, आता ही संख्या 29 वर पोहोचली आहे. छोटाबेटिया पोलिस स्टेशन अंतर्गत बिनागुंडा आणि कोरोनार दरम्यान नक्षलवाद्यांमध्ये दुपारी 3 वाजताच्या दरम्यान मोठी चकमक उडाली होती. 

कालपर जंगलात उडाली चकमक

अधिकची माहिती अशी की, कांकेरच्या छोटेबैठिया पोलीस ठाण्याच्या कालपर जंगलात चकमक उडाली होती. या चकमकीत आतापर्यंत 18 नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त होतं. घटनास्थळावरून चार एके 47, एलएमजी आणि इन्सास रायफलही जप्त करण्यात आले होते.  या चकमकी दरम्यान इन्स्पेक्टरसह बीएसएफचे दोन जवानही जखमी झाल आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

29 नक्षलवादी ठार, घटनास्थळावरुन शस्त्रसाठा जप्त 

कांकेर जिल्ह्यातील दुपारी 3 वाजे च्या सुमारास छोटेबेटिया पोलीस स्टेशन परिसरातील बिनागुंडा-कोरागुट्टा जंगलाजवळील माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. सायंकाळ होत होत नक्षल्याचा मृतांची संख्या 29  वर पोहचली आहे. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात INSAS/AK 47/SLR/Carbine/.303 रायफल्स शस्त्रे मिळाली आहेत. पोलिसांनी सर्व शस्त्रे ताब्यात घेतली आहेत. घटनास्थळाच्या परिसरात अजून ही कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.  3 जवान चकमकीत जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या जवानांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहे. 

29 नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलीस मुख्यालायत नेले

जवानांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र त्या भागात अजून ही शोधमोहीम सुरू असल्याने मृटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.  रात्र झाल्याने शोध कार्यात अडथळा येत असल्याने चकमकीत नेमके किती नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले हे समजू शकलेले नाही. मात्र, बुधवारी या संबंधीचे चित्र स्पष्ट होईल, असल्याचे बोलले जात आहे. जखमी जवानांना हेलिकॉप्टरने आणण्यात आले असून पूर्ण सुरक्षेत रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनास्थळी मिळलेल्या नक्षलयांचे 29 मृतदेह ट्रकच्या साह्याने पोलीस मुख्यालयात नेण्यात येत आले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts