Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad Sanjay Raut Challenges PM Modi For Press Conference Ram Mandir Davos Tour Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) आज महापत्रकार परिषद (Maha Patrakar Parishad)  होत आहे. हा दरोडा कसा पडला?, काय नेमकं झालंय? हे ते सांगणार आहे.  राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) ,एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांनी अशी पत्रकार परिषद घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, जनतेच्या प्रश्नाची उत्तरं दिलं नाहीत,  मात्र आज आम्ही पत्रकार परिषद घेणार आहे. मोदींनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिम्मत दाखवावी, असे संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना आव्हान. तसेच दावोसचा दौरा म्हणजे सरकारी पैशातून काढलेली सहल आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.   

संजय राऊत म्हणाले,  उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद होत आहे. हा दरोडा कसा पडला?, काय नेमकं झालंय? हे ते सांगणार आहे.  महापत्रकार परिषदेत दिल्लीतील दिग्गज वकीलही असणार आहेत. देशातील कोणत्याही पत्रकारानं या आणि प्रश्न विचारा. सगळ्यांची उत्तर आज दिली जातील.

सरकारी पैशांनी दावोसला  सहल काढली : संजय राऊत 

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काय टीका केली आहे.  सरकारी पैशांनी दावोसला  सहल काढली आहे. दावोसला इतका लवाजमा घेऊन गेलेत जा. कोट्यावधींची उधळण सुरू आहे. आधी गुजरातला जे उद्योग गेलेत ते परत आणा. आम्ही जनता फंडमधून तुमच्या दावोस दौ-याचा खर्च करू. बालिशपणा सुरू असून तुम्ही लोकशाहीचा खून केला आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. 

पंतप्रधान मोदींनी 10 वर्षात एकतरी पत्रकार परिषद घेतली का? : संजय राऊत 

राहुल नार्वेकर,एकनाथ शिंदे यांनी अशी पत्रकार परिषद घ्यावी. पंतप्रधान मोदींनी 10 वर्षात एकतरी पत्रकार परिषद घेतली का? आमच्या पत्रकार परिषदेवर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकारच नाही. आमच्यात जनतेच्या प्रश्नांचा सामना करण्याची हिंमत आहे , तुमच्यात आहे का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. 

देशात एक नवपीठ तयार झाले असून त्याचे नाव बीजेपीपीठ : संजय राऊत

सध्या चार शंकराचार्य आणि एक नवपीठ तयार झालंय त्याचे नाव बीजेपीपीठ आहे. मोदी जे करतील तेच होतंय. मंदिर वही बनाएंगे…आम्ही पाडलं कुठे होतं आणि मंदीर बनतंय कुठे हे जाऊन पाह मग तुम्हाला कळेल, कुठे  मंदिर बनतंय हे कळेल, असे देखील संजय राऊत म्हणाले.  

हे ही वाचा :

 

[ad_2]

Related posts