पिंपरी- चिंचवड (pragatbharat.com)-लांडेवाडी, भोसरी येथील हिरामण वसंतराव गोडसे (वय-७६) यांचे नुकतेच निधन झाले. स्व. गोडसे हे आमदार महेश लांडगे यांचे सासरे आहेत. त्यामुळे यावर्षी वाढदिवस ‘सेलिब्रेशन’ होणार नाही. याची भाजपा आणि महायुतीच्या पदाधिकारी, सहकारी आणि हितचिंतकांना नोंद घ्यावी, अशी माहिती भाजपाचे माजी प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघातून विजयाची ‘हॅट्रिक’ केली. त्यामुळे भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि लांडगे यांच्या मित्र परिवारामध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.प्रतिवर्षी दि. २७ नोव्हेंबर रोजी आमदार लांडगे यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला जातो. भोसरी येथील गावजत्रा मैदानावर…
Read MoreDay: November 28, 2024
क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे (क्यू सी एफआय) औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग
चिंचवड २7 ः(pragatbharat.com) क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टर ने यांच्या क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर, भोसरी येथे गुणवत्ता स्पर्धा २०२४ आयोजित करून यावर्षीचा गुणवत्ता महिना साजरा केला हे सलग ११ वे वर्ष होते. फोटोओळ : सरबजीत सिंग भोगल-टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम लि. यांचा सत्कार संचालिका डॉ. रजनी इंदुलकर यांनी स्मृतिचिन्ह देऊन केला, छायाचित्रात डावीकडून भूपेश मॉल व अनंत क्षीरसागर. या कार्यक्रमात ३५ संस्थां मधील ३०७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात ६९ केस स्टडी, ३ स्किट, ३८ पोस्टर्स आणि ३८ स्लोगन या स्पर्धेत एकूण १४८ संघांचा समावेश होता. संघांनी त्यांची गुणवत्ता सुधार केस स्टडी, स्लोगन, पोस्टर आणि स्किट सादर…
Read Moreधर्मनिरपेक्षता कृतीतून व्यक्त करा : डॉ. राजेंद्र कांकरिया
चिंचवड ता २७ :(pragatbharat.com) चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलाचे सचिव डॉ. दीपक शहा यांची प्रेरणा व बी.एड. च्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयात संविधान दिन उच्छाहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया बीएडच्या विभाग प्रमुख डॉ. सुवर्णा गायकवाड, प्रा. पल्लवी चव्हाण उपस्थित होत्या. विद्यार्थिनी शितल डुंबरे यांनी उद्देशिकाचे वाचन करून उपस्थित त्यांना शपथ दिली. संविधान दिनाचे उद्घाटन भारताच्या संविधानाचे पूजन डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्या हस्ते करण्यात आले. संविधान दिनानिमित्त विद्यार्थिनी प्रियंका श्रीवास्तव यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती विशद केली; तर कविता वाचन किरण पाटील या विद्यार्थिनीने केले.…
Read More