पिंपरी- चिंचवड (pragatbharat.com)-लांडेवाडी, भोसरी येथील हिरामण वसंतराव गोडसे (वय-७६) यांचे नुकतेच निधन झाले. स्व. गोडसे हे आमदार महेश लांडगे यांचे सासरे आहेत. त्यामुळे यावर्षी वाढदिवस ‘सेलिब्रेशन’ होणार नाही. याची भाजपा आणि महायुतीच्या पदाधिकारी, सहकारी आणि हितचिंतकांना नोंद घ्यावी, अशी माहिती भाजपाचे माजी प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघातून विजयाची ‘हॅट्रिक’ केली. त्यामुळे भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि लांडगे यांच्या मित्र परिवारामध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.प्रतिवर्षी दि. २७ नोव्हेंबर रोजी आमदार लांडगे यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला जातो. भोसरी येथील गावजत्रा मैदानावर…
Read MoreMonth: November 2024
क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे (क्यू सी एफआय) औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग
चिंचवड २7 ः(pragatbharat.com) क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टर ने यांच्या क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर, भोसरी येथे गुणवत्ता स्पर्धा २०२४ आयोजित करून यावर्षीचा गुणवत्ता महिना साजरा केला हे सलग ११ वे वर्ष होते. फोटोओळ : सरबजीत सिंग भोगल-टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम लि. यांचा सत्कार संचालिका डॉ. रजनी इंदुलकर यांनी स्मृतिचिन्ह देऊन केला, छायाचित्रात डावीकडून भूपेश मॉल व अनंत क्षीरसागर. या कार्यक्रमात ३५ संस्थां मधील ३०७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात ६९ केस स्टडी, ३ स्किट, ३८ पोस्टर्स आणि ३८ स्लोगन या स्पर्धेत एकूण १४८ संघांचा समावेश होता. संघांनी त्यांची गुणवत्ता सुधार केस स्टडी, स्लोगन, पोस्टर आणि स्किट सादर…
Read Moreधर्मनिरपेक्षता कृतीतून व्यक्त करा : डॉ. राजेंद्र कांकरिया
चिंचवड ता २७ :(pragatbharat.com) चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलाचे सचिव डॉ. दीपक शहा यांची प्रेरणा व बी.एड. च्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयात संविधान दिन उच्छाहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया बीएडच्या विभाग प्रमुख डॉ. सुवर्णा गायकवाड, प्रा. पल्लवी चव्हाण उपस्थित होत्या. विद्यार्थिनी शितल डुंबरे यांनी उद्देशिकाचे वाचन करून उपस्थित त्यांना शपथ दिली. संविधान दिनाचे उद्घाटन भारताच्या संविधानाचे पूजन डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्या हस्ते करण्यात आले. संविधान दिनानिमित्त विद्यार्थिनी प्रियंका श्रीवास्तव यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती विशद केली; तर कविता वाचन किरण पाटील या विद्यार्थिनीने केले.…
Read Moreलोकांचे प्रश्न सोडविणाऱ्या राहुलला एक संधी द्या : शरद पवार
पिंपरी, ता. १४ : (pragatbharat.com)‘टेंडर’ मध्ये लक्ष घालणारा नव्हे तर; लोकांचे प्रश्न सोडविणारा कार्यकर्ता म्हणून राहुल कलाटेची ओळख आहे. तुतारीच्या जागृतीने जागे झालेल्या लोकांच्या मताने विकासाची गंगा आणायचे काम राहुलकडून केले जाईल याची मला खात्री आहे. त्यामुळे त्याला एकदा संधी द्या, अशी भावनीक साद राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी गुरुवारी (ता. १४) वाल्हेकरवाडी येथील सभेत चिंचवडच्या मतदारांना घातली. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी उमेदवार राहुल कलाटे, माजी खासदार विदुरा…
Read Moreमोशीकर म्हणतात, ‘बफर झोन’चा प्रश्न सोडवला म्हणून महेशदादासोबत!
पिंपरी-(pragatbharat.com)अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि तत्कालीन आमदारांनी दुर्लक्ष केलेला मोशी येथील ‘बफर झोन’चा प्रश्न आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच सुटला आहे. लांडगे यांच्या पाठपुराव्याने ‘बफर झोन’ची हद्द ५०० मीटरवरून १०० मीटर इतकी कमी करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आम्ही महेश लांडगे यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मोशीकरांनी दिली. या भागातून विजयी मताधिक्य देण्याचा निर्धार केला. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी मोशीतील आदर्शनगर, खान्देशनगर, गंधर्वनगरी, तापकीरनगर, फातिमानगर, संत ज्ञानेश्वरनगर परिसरातील सर्व कॉलनीतील नागरिकांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. चंद्रकांत नखाते, वंदना आल्हाट,…
Read Moreभोसरी, पिंपरी , चिंचवडमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी निवडणूक हातात घ्या- शरद पवार
भोसरी 13 नोव्हेंबर;(pragatbharat.com) महाराष्ट्र राज्य हातामध्ये द्या ,तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्राचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. महिलांचे संरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवकांच्या हाताला काम अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत.त्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बुधवारी भोसरी येथील सभेत म्हणाले. एकेकाळी देशात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होते. आज प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राची घसरण सुरू आहे. गेल्या आठ वर्षाच्या भाजपच्या राजवटीत दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर फेकले गेले आहे .महाराष्ट्राला गतवैभव मिळवून द्यायचे असेल तर राज्य महाविकास आघाडीच्या हातात द्या महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार…
Read Moreशिक्षक विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुलांना मिळणार 3 दिवस सुट्टी
शिक्षक या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने 18, 19 आणि 20 असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याची विनंती राज्याच्या शिक्षण विभागाने शाळांना केलीय. मुंबई -(pragatbharat.com) विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच या निवडणुका सुरळीत पार पडाव्यात, यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, विविध ठिकाणी स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्यात. खरं तर निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी प्रामुख्याने शिक्षकांवर असते. त्या काळात शिक्षकच मतदान केंद्रांवर मतदार यादी तपासणे, मतदाराच्या बोटाला शाही लावणे आणि इतर कामे पाहत असतात. आता सध्या या शिक्षकांचे ट्रेनिंग सुरू असून, 20 तारखेला…
Read Moreआमदार सुनील शेळके यांना नरेंद्र मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’..!
पंतप्रधान मोदी यांनी दिला मावळातील भाजप मतदारांना थेट ‘संदेश’ पुणे (pragatbharat.com.com):- मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांना आज भाजपचे सर्वोच्च नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची आज (मंगळवारी) रात्री पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेतील भाषणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना शेळके यांची औपचारिक ओळख करून दिली. त्यावेळी नतमस्तक होऊन शेळके यांनी मोदी यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर हस्तांदोलन करत पंतप्रधानांनी शेळके यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी उपमुख्यमंत्री…
Read Moreपिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटनेचा जाहीर पाठींबा- पैलवान ग्रुप आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारात
पिंपरी- (pragatbharat.com)आजपर्यंत आपण पैलवानांना मैदानात कुस्ती करताना पाहिले. पण, हेच पैलवान आत्ता भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार पैलवान महेश लांडगे यांच्याकरिता भोसरीचे मैदान मारण्यासाठी आखाड्यात उतरले आहेत. पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटना, पैलवान ग्रुपने आमदार लांडगे यांना जाहीर पाठींबा दिला. हे पैलवान लांडगे यांचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. भोसरीचे मैदान पैलवान महेश लांडगे हेच मारणार, असा विश्वास पैलवानांनी व्यक्त केला. कुस्तीच्या आखाड्यात मैदान गाजवत असतानाच महेश लांडगे यांनी राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, एकदा अपक्ष आणि एकदा भाजपकडून असे दोनवेळा भोसरीचे…
Read Moreविकासाची पालखी वाहणाऱ्या अण्णा बनसोडे यांना विजयी करा..
पिंपरी (pragatbharat.com) :- उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी म्हणतात की ‘आम्ही विचाराचे वारकरी वाहतो विकासाची पालखी’ त्यामुळे विकासाची पालखी वाहण्यासाठी पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना विजयी करावे असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी केले .राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार अण्णा दादू बनसोडे यांची चिंचवड दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर, रामनगर भागाची प्रचार फेरी “प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम” यांच्या उपस्थितीत मंगळवारी काढण्यात आली. राम मंदिरापासून रॅली सुरू झाली राम मंदिर, पंचजन्य टाटा शो रूम, दत्त नगर, शंकर नगर, बाबर वजन काटा, विद्या नगर, परशुराम चौक नगर, राम…
Read More