वाकड, ता. १३ (pragatbharat.com): चिंचवड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आघाडीव उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गुरुवारी (ता १४) जाहीर सभा होत आहे. त्यामुळे, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, विरोधकांना चितपट करण्यासाठी वस्ताद नेमका कुठला डाव टाकणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन याठिकाणी सभेची सर्व तयारी करण्यात आली असून, दुपारी बारा वाजता शरद पवार चिंचवड वासियांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्याच्या सभेसाठी चिंचवड मतदार संघातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी बाईक रॅली काढून, मोठया संख्येने सभेच्या…
Read MoreMonth: November 2024
पिंपरी येथे मतदानासाठी मतदान यंत्रे तयार करणेचे काम सुरू
पिंपरी (अ.जा.)(pragatbharat.com) विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, त्याअनुषंगाने पिंपरी विधानसभा मतदार संघ कार्यालयाकडुन मतदानकेंद्र निहाय मतदान यंत्रे (EVM व VVPAT) मतदानासाठी तयार करणेचे कामकाज आज दि. १३/११/२०२४ सुरूवात करणेत आले आहे. पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघासाठी ४७७ बॅलेट युनिट, ४७७ कंट्रोल युनिट आणि ५१७ व्हीव्हीपॅट मशीन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाले आहेत. पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३९८ मतदान केंद्रे आहेत. या मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ३९८ मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी १ बॅलेट युनिट, १ कंट्रोल युनिट व १ व्हीव्हीपॅट यंत्रे वाटप करण्यात आली असून ७९ बॅलेट युनिट, ७९ कंट्रोल युनिट…
Read Moreभोसरी, पिंपरी , चिंचवडमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी निवडणूक हातात घ्या- शरद पवार
भाजपच्या राजवटीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर भोसरी 13 नोव्हेंबर; (pragatbharat.com) महाराष्ट्र राज्य हातामध्ये द्या ,तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्राचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. महिलांचे संरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवकांच्या हाताला काम अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत.त्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बुधवारी भोसरी येथील सभेत म्हणाले. एकेकाळी देशात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होते. आज प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राची घसरण सुरू आहे. गेल्या आठ वर्षाच्या भाजपच्या राजवटीत दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर फेकले गेले आहे .महाराष्ट्राला गतवैभव मिळवून द्यायचे असेल तर राज्य महाविकास आघाडीच्या हातात द्या…
Read Moreभोसरीत आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष, जेष्ठ नेते शरद पवारांची सभा तर, गुरुवारी रोड-शो…
पिंपरी (pragatbharat.com) :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष, जेष्ठ नेते शरद पवार यांची उद्या बुधवारी (१३ नोव्हेंबर) भोसरीतील गाव जत्रा मैदानावर जाहीर सभा होणार आहे. तर, गुरुवारी (१४ नोव्हेंबर) पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात रोड-शो होणार आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. भोसरीतील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्राचारार्थ पवार यांची सभा होणार आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार असून पक्षाच्या पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत आणि चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. भोसरीत गव्हाणे आणि भाजपचे उमेदवार महेश…
Read Moreपिंपरी चिंचवडच्या आमदारांनी महापालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण केले
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा महायुतीवर घणाघाती हल्ला पिंपरी :(pragatbharat.com) पिंपरी चिंचवड मधील तीनही आमदारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण केले आहे त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये आता पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले व महायुतीवर त्यांनी घणाघाती हल्ले चढवले. पिंपरी विधानसभा मतदार संघात महा विकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. या संवाद मेळाव्यास शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क नेते आमदार सचिन आहेर हेही उपस्थित होते. डॉ.…
Read Moreनेहरूनगरमधून सर्वाधिक लीड देणार – हनुमंत भोसले
– माजी महापौरांचा विश्वास; परिवर्तनाचा शब्द नेहरूनगर खरा करणार-अजित गव्हाणे यांना पाठिंबा; नेहरूनगर परिसराने गर्दीचा उच्चांक मोडला भोसरी 10 नोव्हेंबर:महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ नेहरूनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा या परिसरामध्ये रविवारी (दि.10) काढलेल्या प्रचार दौऱ्याला उच्चांकी प्रतिसाद मिळाला. रविवारी काढलेल्या या प्रचार दौऱ्याने आत्तापर्यंतच्या सर्व गर्दीचे अक्षरशः रेकॉर्ड मोडले. माजी महापौर हनुमंत भोसले यांनी नेहरूनगर मधून सर्वाधिक “लीड” अजित गव्हाणे यांना मिळवून देणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी माजी महापौर वैशाली घोडेकर,विरोधी पक्षनेते राहुल भोसले , माजी नगरसेवक समीर मासुळकर तसेच …
Read Moreअजित गव्हाणे यांना मुस्लिम संघटनांचा पाठिंबा
भोसरी 9 नोव्हेंबर :महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना लब्बैक फाउंडेशन महाराष्ट्र यांच्याशी संलग्न असलेल्या तमाम मुस्लिम बांधवांनी पाठिंबा जाहीर केला आहे. भोसरी मतदारसंघांमध्ये गेल्या 25 वर्षांपासून अजित गव्हाणे यांनी उल्लेखनीय काम केले आहे. आगामी काळात त्यांच्याकडून या मतदारसंघात सुनियोजित काम होण्याचा विश्वास असल्यामुळे त्यांना हा पाठिंबा जाहीर केला असल्याचे लब्बैक फाउंडेशनचे अध्यक्ष अब्दुलगनी मुस्लिम शहा यांनी सांगितले. दरम्यान भोसरी मतदारसंघांमध्ये लब्बैक फाउंडेशन महाराष्ट्र यांच्याशी संलग्न असलेल्या तमाम मुस्लिम बांधवांनी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचे पत्र…
Read Moreचिंचवडकर जनता लुटीचा कॉन्ट्रॅक्टर पॅटर्न हद्दपार करणार ! रोहित पवार
चिंचवड, ता. १० :(pragatbharat.com) चिंचवडमध्ये टँकरराज असून कॉन्ट्रॅक्टमध्ये टक्केवारी आणि मलिदा खाणारी गँग आहे. कॉन्ट्रॅक्ट त्यांचीच कामे त्यांचीच रिंगही त्यांनीच करायची. ह्या लुटीला चिंचवडची जनता वैतागली असून चिंचवडची निवडणूक आता सर्व सामान्य नागरिकांनी हातात घेतली आहे. त्यामुळे चिंचवडकर मतदार यंदा कॉन्ट्रॅक्टर पॅटर्न हद्दपार करणार असल्याचा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ वाल्हेकरवाडी येथील युवक मेळाव्यात ते बोलत होते. चिंचवडच्या स्थानिक नेत्यांवर हल्लाबोल करत त्यांनी युती सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. चिंचवडमध्ये काहींनी फक्त नातेवाईकांना व भाच्यांना पुढ करून लुटमार केली.…
Read Moreसांगवीकरांचा निर्धार, यंदा ‘तुतारी’च वाजवणारराहूल कलाटे यांच्यासाठी खासदार कोल्हेंची बाईक रॅली
वाकड, ता. १० (pragtabharat.com): महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारा्र्थ लोकप्रिय संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांनी रविवारी (ता. १०) चिंचवड मतदार संघात बाईक रॅली काढली होती. यावेळी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, काळेवाडी, रहाटणी परिसरातील युवकांनी रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. चिंचवड विधानसभेला यंदा नवीन चेहरा निवडून देऊन बदल घडवणार अशी भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली. आजच्या रॅली दरम्यान यंदा वारं फिरलंय, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारीच्या जयघोषाने सांगवी, रहाटणी परिसर दणाणून गेलेला. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप, मराठवाडा विकास संघांचे अध्यक्ष अरुण…
Read Moreभारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड जिल्हाकार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शत्रुघ्न काटे यांचे स्वागत व जाहीर सत्कार
चिंचवड, दि. 05 (pragatbharat.com) : भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात कोअर समितीचे सर्व सदस्य, सर्व जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड जिल्हाकार्यकारी अध्यक्ष या शहराच्या राजकीय दृष्टीने महत्वाची जबाबदारी असणाऱ्या पदावर निवड झाल्यानंतर शत्रुघ्न (बापू) काटे हे प्रथमच भाजपा शहर कार्यालयात आले होते. यावेळी शत्रुघ्न काटे यांचे शहर भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कोअर समितीच्या सर्व सदस्यांनी हार व पुस्तक देऊन शत्रुघ्न (बापू) काटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार अमर…
Read More