भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी विधानसभेने, तसेच येथील नागरिकांनी गेल्या १० वर्षांमध्ये जे भोगले त्याची परतफेड करण्यासाठी जनता आतूर आहे. अजित गव्हाणे यांच्या रुपांत शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व मिळणार आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघात “तुतारी वाजणार आणि बदल घडणार” असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिली आहे. अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ खासदार निलेश लंके यांनी कोपरा सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. …
Read MoreDay: October 30, 2024
भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रवि लांडगे यांचा अपक्ष अर्ज दाखल
पिंपरी, दि. २९ (pragatbharat.com) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी मंगळवारी (दि. २९) मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. फक्त सत्ता, पैसा, पैशातून आलेल्या सत्तेचा गैरवापर, खोटी आश्वासने आणि दहशत व भ्रष्टाचाराने पिचलेल्या या जनतेनेच आता माझी निवडणूक हातात घेतली आहे. ही जनतेची आणि शिवसैनिकांच्या स्वाभिमानाची लढाई आहे. भय आणि भ्रष्टाचारमुक्त भोसरी मतदारसंघ करण्यासाठी मी निवडणूक लढणार असल्याचे रवि लांडगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सांगितले. यावेळी शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रभारी अशोक वाळके, शहर समन्वयक कैलास नेवासकर, उपशहरप्रमुख नेताजी काशीद, माजी विरोधी पक्षनेते महादेव गव्हाणे, ज्येष्ठ…
Read Moreभाऊसाहेब भोईर यांचा पिंपरी-चिंचवड परिवर्तन आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल
सामाजिक कार्यकर्ते अमर जाधव, तौसिफ पिंजारी आणि रवींद्र यंगड यांचीही उपस्थिती चिंचवड(pragatbharat.com)-चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी मंगळवारी (ता. २९) पिंपरी चिंचवड परिवर्तन आघाडीचे उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी सोमवारी त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणूनही दोन अर्ज दाखल केले होते, ज्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत मोठी चर्चा झाली आहे. थेरगाव येथील ग-क्षेत्रीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अमोल पवार यांच्याकडे अर्ज सादर करताना भाऊसाहेब भोईर यांचे पुत्र हर्षवर्धन भोईर अधिकृत सूचक म्हणून उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमर जाधव, तौसिफ पिंजारी आणि रवींद्र यंगड यांचीही उपस्थिती होती.सोमवारी झालेल्या…
Read Moreकामगारांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शिरूर तालुक्यातील रांजणगांव एमआयडीसीमध्ये राबविण्यात आला मतदान जनजागृती कार्यक्रम
पुणे, दि. २८ :(pragatbharat.com) “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू”, अशी शपथ शिरूर तालुक्यातील रांजणगांव एमआयडीसीतील साऊथको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामगारांनी घेतली. कामगारांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शिरूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत रांजणगांव एमआयडीसी मधील साऊथको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी येथे मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी कंपनीचे मनुष्यबळ…
Read Moreमाजी आमदार गौतम चाबुकस्वार यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
पिंपरी:(pragatbharat.com) पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.पिंपरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी वतीने राष्ट्रवादी पक्षाच्या माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंतधर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. परंतु पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला दावा केला होता हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला मिळावा यासाठी सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न केले परंतु महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वाट्याला गेला, त्यामुळे पिंपरी मधील शिवसैनिकांचा भ्रमनिरास झाला. माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी पिंपरी…
Read Moreपिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी सुलक्षणा धर यांच्या सोबत ३३ उमेदवाराचे अर्ज दाखल
पिंपरी(pragatbharat.com)२०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक २९/१०/२०२४ रोजी ३३ नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत ते पुढील प्रमाणे -१) सुंदर म्हसुकांत कांबळे- बहुजन समाज पार्टी, २)दिपक सौदागर रोकडे-अपक्ष, ३) स्वप्नील दादाराव कांबळे – अपक्ष, ४) मनोज भास्कर गरबडे – वंचित बहुजन आघाडी २ अर्ज, ५) राजेंद्र मानसिंह छाजछिडक – राष्ट्रीय बाल्मिकी सेना पार्टी,६) ॲड.गौतम सुखदेव चाबुकस्वार-अपक्ष ७) नवनाथ चंद्रकांत शिंदे- समता पार्टी ८) भिकाराम किसन कांबळे-२ अर्ज,९) मनोज विष्णू कांबळे – अपक्ष १०) बाबासाहेब किसन कांबळे – अपक्ष,११) राहुल मल्हारी सोनावणे – विद्यूतलै चिरूतैगल कच्ची(VCK) १२) ॲड गौतम प्रल्हाद कुडुक- अपक्ष १३) सुलक्षणा राजू धर…
Read Moreशक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी केला अर्ज दाखल
वाकड, ता. २९ :(pragatbharat.com) चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी मंगळवारी (ता. २९) जोरदार शक्ती प्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. थेरगाव : चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे समवेत पृथ्वीराज साठे, नवनाथ जगताप, मच्छिन्द्र तापकीर, संपत पवार यावेळी खासदार अमोल कोल्हे, अखिल भारतीय काँग्रेस कमीटीचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, सुनिल गव्हाणे, माजी नगरसेवक नवनाथ जगताप, मच्छिन्द्र तापकीर, संपत पवार, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष इम्रान शेख,…
Read Moreभोसरीत महेश लांडगे समर्थकांचा ‘महाविजयचा संकल्प’..
माजी महापौर राहुल जाधव, माजी महापौर मंगला कदम यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेना नेते इरफान सय्यद, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाला वाव्हळकर, बाळासाहेब भागवत उपस्थित पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२४-pragatbharat.com) :- भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी समर्थकांनी विजयाची ‘हॅटट्ट्रीक’ करण्याचा निर्धार केला. सकाळी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज आणि प्रमुख मंदिरांमध्ये दर्शन घेण्यात आले. त्यानंतर पदयात्रेला सुरवात करण्यात आली. बापुजी बुआ चौक- लांडगे लिंबाजी तालिम मित्र मंडळ- भैरवनाथ मंदिर- मारुती मंदिर- पीएमटी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना…
Read Moreभोसरी विधानसभेतून महाविकास आघाडीतर्फे अजित गव्हाणे यांचा अर्ज दाखल…
शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२४-pragatbharat.com) :- महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे सोमवारी ( दि 28 ) दुपारी दीड वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या चरणी श्रीफळ वाढविले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. फुलांची उधळण, रांगोळीच्या पायघड्या, फटाक्यांची आतिषबाजी आणि हजारो कार्यकर्त्यांचे मोठे शक्ती प्रदर्शन असे परिवर्तनाचे तुफान पाहून विरोधकांना धडकी भरली. भोसरी मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी, शिवसेना (उबाठा)…
Read More‘पिंपरी विधानसभेत माझा विजय निश्चित’ – आ. अण्णा बनसोडे…
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस-भाजप-शिवसेना-आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आ. अण्णा बनसोडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सोमवारी (दि. २८) रोजी विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी अर्चना यादव यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल, खा. श्रीरंग बारणे, शिवसेना शिंदे गटाचे उपनेते इरफान सय्यद, भाजपकडून आ. अमित गोरखे, उमा खापरे उपस्थित होते. दरम्यान मतदार संघातून निघताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि मतदार संघातील नागरिक स्वयंस्फूर्तीने आ. बनसोडे यांच्यासोबत होते. विशेषतः महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय…
Read More