माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी:(pragatbharat.com) पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.पिंपरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी वतीने राष्ट्रवादी पक्षाच्या माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंतधर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. परंतु पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला दावा केला होता हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला मिळावा यासाठी सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न केले परंतु महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वाट्याला गेला, त्यामुळे पिंपरी मधील शिवसैनिकांचा भ्रमनिरास झाला.

माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मागील पाच वर्षापासून तयारी सुरू केली होती, माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांना पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सर्व समस्यांची चांगलीच जाण आहे तसेच त्या समस्यांचे निराकरण करण्याची धमक गौतम चाबुकस्वार यांच्यामध्ये आहे.

2014 ते 2017 या कालावधीत गौतम चाबुकस्वार यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मागील निवडणुकीत अण्णा बनसोडे विरोधात झालेल्या निवडणुकीमध्ये गौतम चाबुकस्वार यांना फार थोड्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदाही जर महाविकास आघाडी वतीने गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी दिली गेली असती तर गौतम चाबुकस्वार हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे पुन्हा एकदा आमदार झाले असते असे काही जाणकारांचे मत आहे. परंतु गौतम चाबुकस्वार यांनी हार न मानता अपक्ष निवडणूक लढणार या हेतूने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Related posts