बिहार सरकारकडून जातीय जनगणनेचे आकडेवारी जाहीर, देशात पहिल्यांदा एखाद्या राज्याकडून जातनिहाय जनगणना

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bihar Caste Survey Result : बिहार सरकारने जातीय निहाय गणना सर्व्हेची (Bihar Caste Census Result) आकडेवारी जाहीर केली आहे. देशात प्रथमच एखाद्या राज्याकडून अशी जातनिहाय जनगणना जाहीर केली आहे. बिहार सरकारनं जातीय जनगणनेचे आकडे जाहीर केले आहेत. बिहारमध्ये ओबीसींची लोकसंख्या 63 टक्के आहे. 27 टक्के लोकसंख्या मागास, तर 36 टक्के अतिमागास आहे. दलितांची संख्या 19 टक्के तर अनुसूचित जमातींची संख्या केवळ 2 टक्के एवढी आहे. सरकारच्या जातीय जनगणनेच्या निर्णयानं बिहारमध्ये पुन्हा एकदा मंडल राजकारणाची एन्ट्री झाल्याचं बोललं जातं आहे. महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये जातीय जनगणनेची मागणी होत आहे.

नितीश कुमार यांचा मास्टरस्ट्रोक

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे. बिहार सरकारकडून जातीय जनगणनेची आकडेवारी जारी करण्यात आली आहे. सरकारने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये 13 कोटी लोकसंख्या आहे. यामध्ये सर्वाधिक हिंदू 81.9 टक्के आहेत. तर मुस्लिम 17.7 टक्के, ख्रिश्चन 0.05 टक्के, शिख 0.01 टक्के, बौद्ध 0.08 टक्के, जैन 0.0096 टक्के आणि अन्य धर्मीय 0.12 टक्के आहेत.

 

 

 

[ad_2]

Related posts