विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

पुणे, दि. १०:(pragatbharat.com) विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रम पेरणे, ता. हवेली येथे दरवर्षीप्रमाणे १ जानेवारी २०२५ रोजी साजरा होत असून पुणे ग्रामीण जिल्ह्यात ३० डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्रीपासून (००.०० वा.) ते २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीपर्यंत (२४.०० वा.) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी हे आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार या कालावधीत कोणाही व्यक्तीला इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर (सध्याचे एक्स), फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश, खोटी माहिती…

Read More

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा नागपूर विधानभवनावर समाज्याच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दि.१९ डिसेंबर २०२४ सकाळी ११ वा. मोर्चा यशवंत स्टेडियम येथे सुरू होऊन विधानभवनावर मोर्चा

मुंबई :(pragatbharat.com)राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे सर्व जिल्हा व तालुका पधादिकाऱ्यांना कळविण्यात येते की, समाज्याच्या विविध मागण्यांसाठी यापूर्वी दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर प्रचंड मोर्चाचे आयोजन करून मागण्यांचे निवेदन  मा. मुख्यमंत्री यांना  देण्यात आले होते. मात्र त्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. आता त्यावर तातडीने कार्यवाही करावी यासाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने *गुरुवार दि.१९ डिसेंबर २०२४ रोजी  सकाळी ११ वा. विधानभवन नागपूर* येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री मा. श्री.  बबनराव (नाना) घोलप यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन केले आहे.सदर मोर्चा *यशवंत…

Read More