पीसीसीओईआरमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण मेळावा संपन्न

पिंपरी, पुणे (pragatbharat.com) पीसीइटीच्या पीसीसीओईआरमध्ये (२ सोमवारी) सकाळी १०:०० वाजता आंतरराष्ट्रीय शिक्षण मेळा अलिफ ओव्हरसीज, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पीसीओइआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, डॉ. रमेश राठोड, डॉ. कीर्ती धारवाडकर, डॉ. ऐश्वर्या गोपाल कृष्णन यांच्या हस्ते झाले.       या मेळ्यात ३० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. या मेळाव्यात बीएसबीआय (जर्मनी), रॉयल हॉलवे (युके), युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स ट्रिनिटी सेंट डेविड (युके), वेबस्टर युनिव्हर्सिटी (स्विझर्लंड), नॅशनल कॉलेज ऑफ आयर्लंड (आयर्लंड), लीड्स ट्रिनिटी (युके), हेरियट व्हॉट (युके), यूमास बोस्टन (युएसए),  युनिव्हर्सिटी कॅनडा वेस्ट…

Read More

विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

पुणे, दि. १०:(pragatbharat.com) विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रम पेरणे, ता. हवेली येथे दरवर्षीप्रमाणे १ जानेवारी २०२५ रोजी साजरा होत असून पुणे ग्रामीण जिल्ह्यात ३० डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्रीपासून (००.०० वा.) ते २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीपर्यंत (२४.०० वा.) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी हे आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार या कालावधीत कोणाही व्यक्तीला इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर (सध्याचे एक्स), फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश, खोटी माहिती…

Read More

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा नागपूर विधानभवनावर समाज्याच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दि.१९ डिसेंबर २०२४ सकाळी ११ वा. मोर्चा यशवंत स्टेडियम येथे सुरू होऊन विधानभवनावर मोर्चा

मुंबई :(pragatbharat.com)राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे सर्व जिल्हा व तालुका पधादिकाऱ्यांना कळविण्यात येते की, समाज्याच्या विविध मागण्यांसाठी यापूर्वी दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर प्रचंड मोर्चाचे आयोजन करून मागण्यांचे निवेदन  मा. मुख्यमंत्री यांना  देण्यात आले होते. मात्र त्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. आता त्यावर तातडीने कार्यवाही करावी यासाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने *गुरुवार दि.१९ डिसेंबर २०२४ रोजी  सकाळी ११ वा. विधानभवन नागपूर* येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री मा. श्री.  बबनराव (नाना) घोलप यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन केले आहे.सदर मोर्चा *यशवंत…

Read More

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) चे डॉ. योगेश भावसार यांना पीएचडी प्रदान 

पिंपरी, पुणे (दि. १४ डिसेंबर २०२४ pragatbharat.com) –पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) चे प्रा. योगेश विनोद भावसार यांना पुणे येथील श्री बालाजी विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. भावसार यांनी “भारतीय उत्पादन क्षेत्रातील दीर्घकालीन एकीकरणाचे आर्थिक कामगिरीचे विश्लेषण” या विषयावर शोधप्रबंध सादर केला. डॉ. भावसार हे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) या संस्थेमध्ये रजिस्ट्रार व ओएसडी या पदावर कार्यरत आहेत. तसेच त्यांचा वरील विषयावर आधारीत शोधप्रबंध तुर्की येथे ऑनलाईन जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. डॉ. लिना डाम यांचे मार्गदर्शन लाभले.      या पदवी प्रदान सोहळ्यात बालाजी विद्यापीठाचे…

Read More

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि दक्षिण कोरियातील क्वांगवून विद्यापीठात शैक्षणिक सामंजस्य करार

पिंपरी(pragatbharat.com) दक्षिण कोरियातील क्वांगवून विद्यापीठ जागतिक पातळीवर उत्कृष्ट, दर्जेदार, आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण देण्यासाठी नावलौकिक मिळवला आहे.‌ पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) शैक्षणिक समूहातील संस्थेमधील विद्यार्थी, प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च शैक्षणिक संधी, संशोधन करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे असे मत दक्षिण कोरियाच्या क्वांगवून विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विभाग संचालक डॉ. सुंगवू बेंजामिन चो यांनी व्यक्त केले.    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) आणि क्वांगवून विद्यापीठ यांच्या मध्ये नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला.‌ निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे झालेल्या कार्यक्रमात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे पीसीईटी…

Read More

छोट्या राज्यात विरोधक; मोठ्या राज्यात भाजप: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार  

कोल्हापूर :-(pragatbharat.com)  मोठ्या राज्यात भाजपचा विजय झाला आहे, तर छोटी राज्ये विरोधकांकडे गेली आहेत, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.कोल्हापूरमध्येे पत्रकार परिषदेत पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. मारकडवाडी येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार असल्याचे सांगत ते म्हणाले, निवडणुकीत यश मिळाल्यानंतर एक उत्साहाचे वातावरण असते. पण, मला महाराष्ट्रात तसे वातावरण दिसत नाही. पण, मी उगीचच आरोप करणार नाही. कारण माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. आम्ही फक्त मतदानाची आकडेवारी गोळा केली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला एकंदर किती मते मिळाली आणि त्यांचे किती लोक निवडून आले याचे विश्लेषण केले.…

Read More

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथे व्याख्यान, कविसंमेलन,भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी :(pragatbharat)भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचार व कार्याला अभिवादन करण्यासाठी पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे (भीमसृष्टी ) ६ डिसेंबर२०२४ रोजी दिवसभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. “भिमांजली – कृतज्ञ देशाची महामानवाला आदरांजली”  या शीर्षकाखाली महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन अभिवादन समिती, पिंपरी चिंचवड शहर  यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ६ डिसेंबर २०२४  रोजी सकाळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मानवंदना, सामुहिक वंदना होणार असून याठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.          सकाळच्या सत्रात ११ वाजता  युवा…

Read More