भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथे व्याख्यान, कविसंमेलन,भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी :(pragatbharat)भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचार व कार्याला अभिवादन करण्यासाठी पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे (भीमसृष्टी ) ६ डिसेंबर२०२४ रोजी दिवसभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

“भिमांजली – कृतज्ञ देशाची महामानवाला आदरांजली”  या शीर्षकाखाली महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन अभिवादन समिती, पिंपरी चिंचवड शहर  यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ६ डिसेंबर २०२४  रोजी सकाळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मानवंदना, सामुहिक वंदना होणार असून याठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. 

        सकाळच्या सत्रात ११ वाजता  युवा व मान्यवरांचे विविध विषयांवर आधारित व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रा.किशोर गवळी यांचे   “सर्वसमावेशक विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर  “सोशल मीडिया- आंबेडकरी चळवळीसाठी वरदान की शाप”  या विषयावर विद्यार्थी चळवळीचे कार्यकर्ते संतोष शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तर  “१९५६ नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील आजचे सामाजिक अस्तित्व” या विषयावर आधारित कचरूदादा ओव्हाळ यांचे व्याख्यान पार पडणार आहे. तसेच  एस.एल वानखेडे हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक धोरण’ या विषयावर विचार मांडणार आहेत.तर  प्रज्ञा कुमार गावंडे यांचे महामानव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना दिलेले हक्क  आणि अधिकार’ या विषयावर आधारित व्याख्यान होणार आहे.  तसेच विजय वाघमारे यांचे “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे अपुरे राहिलेले कार्य” याविषयावर तर ऍड.मिलिंद कांबळे यांचे “भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती” या विषयावर आधारित व्याख्यान होणार आहे. धम्मपाल वाघमारे हे “आंबेडकरी चळवळ आणि आर्थिक साक्षरता” या विषयावर विचार मांडणार आहेत.  दुपारच्या सत्रात १ वाजता  “ शब्दफुले  निळ्या पाखरांची ..” या  मुक्त कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या कविसंमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार,कार्य आणि संविधान यावर आधारित कवितांचे सादरीकरण कवी सुमंत गुणवंत, सागर काकडे, जित्या जाली, रवी कांबळे आदी   निमंत्रित काविद्वारे केले जाणार आहे.सायंकाळच्या सत्रात ४ वाजता स्थानिक कलाकारांचा गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला असून यामध्ये गायिका सुमन चोपडे, प्रज्ञा इंगळे,साधना मेश्राम, संगीता भंडारे, वैशाली नगराळे, दीक्षा वाव्हळ, गायक संकल्प गोळे, शेखर गायकवाड, भारतबाबू लोणारे,  विशाल ओव्हाळ, अनिरुद्ध सूर्यवंशी,धीरज वानखेडे,सुनील गायकवाड आदी कलाकार भीमगीतांच्या माध्यमातून महामानवाला अभिवादन करणार आहेत.  सायंकाळी ७ वाजता ख्यातनाम ज्येष्ठ गायक  नागसेनदादा सावदेकर यांच्या शब्द सुरातून महामानवाला संगीतमय अभिवादन करण्यात येणार असून दिवसभर विविध अभिवादनपर कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने अनुयायी, नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अभिवादन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.        

     

Related posts