जगभरात प्रत्येक ….आठपैकी एका मुलीवर होतोय लैंगिक अत्याचार  

‘युनिसेफ’च्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर  जिनिव्हा : ( pragatbharat.com) जगभरात प्रत्येक आठ मुलींपैकी एका मुलीवर लैंगिक अत्याचार होत असून, आतापर्यंत ३७ कोटी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे वास्तव ‘युनिसेफ’ने जारी केलेल्या अहवालातून समोर आले आहे. युनिसेफच्या अहवालातून मुले-मुली आणि महिलांवर होत असलेल्या बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या पीडितांची संख्या आणि व्याप्ती समोर आली आहे. ही माहिती कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारी आहे. जगातील तब्बल ३७ कोटी अल्पवयीन मुलींना वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्याआधी एकदातरी बलात्कार, लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे,  म्हणजेच दर आठ मुलींमागे एका मुलीला या भयंकर अनुभवाचा सामना…

Read More

राज्यात निवडणुका जाहीर , २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला निकाल  

मुंबई : (pragatbharat,com) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. राज्यात २० नोव्हेंबर २०२४  रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात एका टप्प्यात निवडणुका पार पडतील. तर, २३ नोव्हेंबर २०२४ ला मतमोजणी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. राज्यात २० नोव्हेंबर २०२४  रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात…

Read More

अमेरिकेच्या कोलोराडो राज्यातील क्रिपल क्रीक शहराजवळील मॉली कॅथलीन या सोन्याच्या खाणीतून २३ जणांची सुटका; एकाचा मृत्यू   

डेन्व्हर (pragatbharat.com): अमेरिकेच्या कोलोराडो राज्यातील क्रिपल क्रीक शहराजवळील मॉली कॅथलीन या सोन्याच्या खाणीत लिफ्ट निकामी झाल्याने एकाचा मृत्यू झाला. तर २३ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. टेलर काउंटीचे शेरिफ जेसन माइसेल म्हणाले, पर्यटक मॉली कॅथलीन या सोन्याच्या खाणीत लिफ्टने खाली जात होते; परंतु पृष्ठभागापासून जवळपास ५०० फूट खाली असताना लिफ्टमध्ये यांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे १२ पर्यटक लिफ्टमध्ये अडकले. त्यामधील अकरा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामधील चार जखमी आहेत. तर एकाचा मृत्यू झाला. याचदरम्यान लिफ्टमध्ये जमिनीपासून जवळपास १ हजार फूट खाली असलेल्या इतर ११ जणांचीही सुखरूप सुटका करण्यात आली. लिफ्टमध्ये बिघाड…

Read More

महाराष्ट्रतील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३८ निर्णय घेण्यात आले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३८ निर्णय मुंबई, : नॉन क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची विनंती केंद्र सरकारला करण्याचा निर्णय गुरूवारी राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत घेण्यात आला. उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यासंदर्भात (नॉन-क्रिमीलेअर) उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांवरून पंधरा लाख करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल आणखी ३८ निर्णय घेण्यात आले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाच्या लाभासाठी नॉन क्रिमीलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवण्याची शिफारस केंद्राला करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारपर्यंत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होताच राज्यात…

Read More

उद्योगपती, समाजसेवी उद्योग रतन टाटा पंचतत्त्वात विलीन  

मुंबई (pragatbharat.com): भारत देशाचे उद्योगपती, समाजसेवी रतन टाटा यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.नोएल टाटा यांसह कुटुंबातील अन्य सदस्य, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर, तसेच टाटा उद्योग समूहातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, पारशी परंपरेनुसार विधी पार पडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आदींनी टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. परवा रात्री उशिरा रतन टाटा यांनी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.…

Read More

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; विधानसभेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली (pragatbharat.com):- मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दशकांपासून करत आली आहे. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केली आहे.…

Read More

सत्ताबदलासाठी वातावरण अनुकूल :शरद पवार   

सांगली (pragatbharat.com): लोकसभा निवडणुकीतील चित्र पाहता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी वारंवार यावे. जेणेकरून, राज्यात लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती होऊन महाविकास आघाडीचा विजय सुकर होईल, असा टोला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भाजपला लगावला. सध्या राज्यात सत्ता बदलासाठी अनुकूल वातावरण असल्याचेही पवार यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट सांगितले. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी राज्यात १८ प्रचार सभा घेतल्या. त्यापैकी, १४ ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. आता त्यांनी विधानसभेलाही राज्यात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात म्हणजे महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल, असे पवार यावेळी म्हणाले.

Read More

विधानसभा निवडणुका पूर्व चर्मकार समाजाच्या सर्व मागण्या मान्य न केल्यास संघटना रस्त्यावर उतरणार -राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप

मुंबई (pragatbharat.com):-महाराष्ट्रातील होणाऱ्या विधानसभा निवडणूक पूर्व चर्मकार समाजाच्या सर्व मागण्या मान्य न केल्यास राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही संघटना लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून आपल्या मागण्यांसाठी अन्याय हक्कासाठी शासनाच्या विरोधात आंदोलन करेल असे जाहीर आवाहन व माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी समाज कल्याण मंत्री बबनराव उर्फ नानासाहेब घोलप यांनी येथे सांगितले राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा भव्य आठवण मोर्चा काढण्यात आला.*या मोर्चा मध्ये राज्य भरातील चर्मकार समाजातील हजारो चर्मकार बंधू – भगीनीं मोठ्या संख्यने सहभागी झाले.दिनांक १२/२/२०२४ झालेल्या बैठकीत,मान.मुख्यमंत्री व नानासाहेब यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मुख्य पदाधिकारी यांनी मान.मुख्यमंत्री एकनाथ शिंदें…

Read More