शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२४-pragatbharat.com) :- महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे सोमवारी ( दि 28 ) दुपारी दीड वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या चरणी श्रीफळ वाढविले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. फुलांची उधळण, रांगोळीच्या पायघड्या, फटाक्यांची आतिषबाजी आणि हजारो कार्यकर्त्यांचे मोठे शक्ती प्रदर्शन असे परिवर्तनाचे तुफान पाहून विरोधकांना धडकी भरली. भोसरी मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी, शिवसेना (उबाठा)…
Read MoreMonth: October 2024
‘पिंपरी विधानसभेत माझा विजय निश्चित’ – आ. अण्णा बनसोडे…
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस-भाजप-शिवसेना-आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आ. अण्णा बनसोडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सोमवारी (दि. २८) रोजी विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी अर्चना यादव यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल, खा. श्रीरंग बारणे, शिवसेना शिंदे गटाचे उपनेते इरफान सय्यद, भाजपकडून आ. अमित गोरखे, उमा खापरे उपस्थित होते. दरम्यान मतदार संघातून निघताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि मतदार संघातील नागरिक स्वयंस्फूर्तीने आ. बनसोडे यांच्यासोबत होते. विशेषतः महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय…
Read Moreफेस्टिव्हल धमाका की फसवणुकीचा धोका?
दिवाळीच्या ‘आकर्षक’ ऑफर्समध्ये फसवणुकीला बळी पडण्यापूर्वी हे नक्की वाचा! दिवाळीचा सण म्हणजे घरातले दीप, गोडधोड पदार्थ आणि नवीन खरेदीचे आकर्षण. मात्र, जशी आपल्या दिवाळीच्या खरेदीची यादी वाढते, तशी सायबर गुन्हेगारांची संधीही वाढते. आकर्षक ऑफर्स, “स्वस्तात मस्त” डील्स, आणि “फेस्टिव्हल धमाका” सेल्सच्या नावाखाली फसवणूक करणारे लोकांना अगदी विश्वासार्ह वाटणाऱ्या ऑफर्सच्या माध्यमातून आपल्या खिशात हात घालतात. या सणात फसवणुकीला बळी पडण्याआधी सावध राहा, कारण एक चुकीचा निर्णय तुम्हाला आर्थिक संकटात ढकलू शकतो.चला जाणून घेऊया सर्वात कॉमन सायबर फसवणुकीचे प्रकार आणि त्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे उपाय. १. नकली वेबसाइट्स आणि ऑफर्सची फसवणूक”दिवाळी बंपर…
Read Moreप्रतिभा महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे पेटंट मिळवण्यात यश
चिंचवड २५ :(pragatbharat.com) चिंचवड येथील प्रतिभा शैक्षणिक संकुलाच्या प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजचे प्रा.रोहित आकोलकर आणि प्रा.अनिता विश्वकर्मा यांना वाणिज्य क्षेत्रातील स्मार्ट मार्केटिंग मॅनेजमेंट असिस्टंट या विषयावर पेटंट प्राप्त झाले आहे. यामध्ये अमरावती येथील श्रीमती केसरबाई लाहोटी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.आशिष मेहता व डॉ.रचना राठी यांचा सुद्धा सहभाग आहे. या संशोधनाने मार्केटिंगच्या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापन अधिक सुलभ करता येईल. या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या.शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधनाला विशेष महत्त्व आहे, जितके अधिक संशोधन आणि नाविन्य असते, तितके शिक्षण व्यवस्थेत…
Read Moreआचारसंहितेनंतर काढलेल्या शासन निर्णयांची चौकशी करणार; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, (pragatbharat.com): राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही महायुती सरकारने मंगळवारी एकामागोमाग दोनशेहून अधिक शासन निर्णय जारी केले. केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु झाल्यानंतर जारी झालेल्या शासन निर्णयाची चौकशी करण्याची घोषणा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बुधवारी केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीची पत्रकार परिषदेतून माहिती दिली. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही आमदारांच्या निधी वाटपासह प्रशासकीय प्रकल्पांना मान्यता, बदल्या, नियुक्त्यांचे शासन निर्णय जारी केले. यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याकडे माध्यमांनी लक्ष वेधले. त्यावर उत्तर…
Read Moreजीवन कला मंदिर, थेरगाव इथे सरस्वती पूजन संपन्न
थेरगाव :(pragatbharat.com)जीवन कला मंदिर थेरगाव इथे सरस्वतीदेवी पूजन तिथीचे औचित्य साधून गुरुवार, दिनांक १० ऑक्टोंबर रोजी सरस्वती पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. अडीच ते सहा वर्ष वयोगटातील ४० बालक–बालिका, त्यांचे पालक, पूर्णवाद उपासक व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्णवाद तत्वज्ञान हे वेद आधारित तत्वज्ञान आहे. याच पूर्णवाद परिवाराने थेरगाव इथे २००६ मध्ये जीवन कला मंदिर स्थापन केले असून मंदिरात गणपती व सरस्वती यांच्या मूर्ती देखील स्थापन केल्या आहेत. भारतीय शिक्षण पद्धतीचा मागोवा घेतला तर कधीकाळी गुरुगृही जाऊन शिक्षण घ्यावे लागे. शिक्षणाचा ओनामा हा सरस्वती पूजन करुन होत असे. सरस्वति…
Read Moreजगभरात प्रत्येक ….आठपैकी एका मुलीवर होतोय लैंगिक अत्याचार
‘युनिसेफ’च्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर जिनिव्हा : ( pragatbharat.com) जगभरात प्रत्येक आठ मुलींपैकी एका मुलीवर लैंगिक अत्याचार होत असून, आतापर्यंत ३७ कोटी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे वास्तव ‘युनिसेफ’ने जारी केलेल्या अहवालातून समोर आले आहे. युनिसेफच्या अहवालातून मुले-मुली आणि महिलांवर होत असलेल्या बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या पीडितांची संख्या आणि व्याप्ती समोर आली आहे. ही माहिती कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारी आहे. जगातील तब्बल ३७ कोटी अल्पवयीन मुलींना वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्याआधी एकदातरी बलात्कार, लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे, म्हणजेच दर आठ मुलींमागे एका मुलीला या भयंकर अनुभवाचा सामना…
Read Moreराज्यात निवडणुका जाहीर , २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला निकाल
मुंबई : (pragatbharat,com) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात एका टप्प्यात निवडणुका पार पडतील. तर, २३ नोव्हेंबर २०२४ ला मतमोजणी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात…
Read Moreअमेरिकेच्या कोलोराडो राज्यातील क्रिपल क्रीक शहराजवळील मॉली कॅथलीन या सोन्याच्या खाणीतून २३ जणांची सुटका; एकाचा मृत्यू
डेन्व्हर (pragatbharat.com): अमेरिकेच्या कोलोराडो राज्यातील क्रिपल क्रीक शहराजवळील मॉली कॅथलीन या सोन्याच्या खाणीत लिफ्ट निकामी झाल्याने एकाचा मृत्यू झाला. तर २३ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. टेलर काउंटीचे शेरिफ जेसन माइसेल म्हणाले, पर्यटक मॉली कॅथलीन या सोन्याच्या खाणीत लिफ्टने खाली जात होते; परंतु पृष्ठभागापासून जवळपास ५०० फूट खाली असताना लिफ्टमध्ये यांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे १२ पर्यटक लिफ्टमध्ये अडकले. त्यामधील अकरा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामधील चार जखमी आहेत. तर एकाचा मृत्यू झाला. याचदरम्यान लिफ्टमध्ये जमिनीपासून जवळपास १ हजार फूट खाली असलेल्या इतर ११ जणांचीही सुखरूप सुटका करण्यात आली. लिफ्टमध्ये बिघाड…
Read Moreमहाराष्ट्रतील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३८ निर्णय घेण्यात आले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३८ निर्णय मुंबई, : नॉन क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची विनंती केंद्र सरकारला करण्याचा निर्णय गुरूवारी राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत घेण्यात आला. उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यासंदर्भात (नॉन-क्रिमीलेअर) उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांवरून पंधरा लाख करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल आणखी ३८ निर्णय घेण्यात आले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाच्या लाभासाठी नॉन क्रिमीलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवण्याची शिफारस केंद्राला करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारपर्यंत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होताच राज्यात…
Read More