अमेरिकेच्या कोलोराडो राज्यातील क्रिपल क्रीक शहराजवळील मॉली कॅथलीन या सोन्याच्या खाणीतून २३ जणांची सुटका; एकाचा मृत्यू   

डेन्व्हर (pragatbharat.com): अमेरिकेच्या कोलोराडो राज्यातील क्रिपल क्रीक शहराजवळील मॉली कॅथलीन या सोन्याच्या खाणीत लिफ्ट निकामी झाल्याने एकाचा मृत्यू झाला. तर २३ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. टेलर काउंटीचे शेरिफ जेसन माइसेल म्हणाले, पर्यटक मॉली कॅथलीन या सोन्याच्या खाणीत लिफ्टने खाली जात होते; परंतु पृष्ठभागापासून जवळपास ५०० फूट खाली असताना लिफ्टमध्ये यांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे १२ पर्यटक लिफ्टमध्ये अडकले. त्यामधील अकरा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामधील चार जखमी आहेत. तर एकाचा मृत्यू झाला. याचदरम्यान लिफ्टमध्ये जमिनीपासून जवळपास १ हजार फूट खाली असलेल्या इतर ११ जणांचीही सुखरूप सुटका करण्यात आली. लिफ्टमध्ये बिघाड कसा झाला हे अद्याप समोर आलेले नाही. ही खाण १८०० च्या दशकात उघडली गेली आणि १९६१ मध्ये बंद झाली.  सध्या ही खाण केवळ पर्यटनासाठी वापरली जाते. पर्यटकांना खाणीत १ हजार फुटांपर्यंत खाली जाता येते. 

Related posts