मुंबई : (pragatbharat,com) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात एका टप्प्यात निवडणुका पार पडतील. तर, २३ नोव्हेंबर २०२४ ला मतमोजणी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात एका टप्प्यात निवडणुका पार पडतील. तर, २३ नोव्हेंबर २०२४ ला मतमोजणी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली.

निवडणूक जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करण्यासोबत आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याचीही घोषणा केली.
निवडणूक आयोगाला २६ नोव्हेंबर २०२४ पूर्वी निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्यापूर्वी म्हणजेच २० नोव्हेंबरला मतदान पर पडेल. तर २३ नोव्हेंबरला महाष्ट्रातील जनता महायुतीला निवडते की महाविकास आघाडीला याचा निकाल लागेल.
महाराष्ट्रात किती मतदार?- महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार महिला मतदार – ४.६६ कोटी पुरुष मतदार – ४.९७ कोटी युवा मतदार – १.८५ कोटी नव मतदार – २०.९३ लाख
राज्यातील मतदान केंद्रांची माहिती -महाराष्ट्रात १ लाख १८३ मतदान केंद्र-शहरी मतदान केंद्र – ४२, ०४-ग्रामीण मतदान केंद्र – ५७,५८२-महिला अधिकाऱ्यांची मतदान केंद्र – ३८८-नव अधिकाऱ्यांची मतदान केंद्र – २९९-प्रचार तोफा कधी थंडावणार?निवडणुका या येत्या महिना भरात पार पडणार असल्याने राजकीय पक्षांकडे प्रचारासाठी खूप वेळ शिल्लक आहे. १८ नोव्हेंबरला प्रचार तोफा थंडावतील.
झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका-झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.
वायनाड लोकसभा जागेसाठी १३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक-२३ नोव्हेंबरला निकाल
केरळच्या वायनाड लोकसभा जागेवर १३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होईल आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील, असे निवडणूक आयोगाने (ECI) मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.१३ नोव्हेंबरला विधानसभेच्या ४८ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे – उत्तराखंडमधील केदारनाथ विधानसभेची जागा आणि २० नोव्हेंबरला महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघ.वायनाडची जागा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोडली होती, ज्यांनी लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून अनुक्रमे ६.५ लाख आणि ३.६ लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.यापूर्वी जूनमध्ये काँग्रेसने प्रियंका गांधी यांना वायनाड जागेसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. त्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, “मी अजिबात घाबरलेली नाही, वायनाडचे प्रतिनिधित्व करू शकले याचा मला खूप आनंद आहे. मी त्यांची (राहुलची) अनुपस्थिती त्यांना जाणवू देणार नाही… माझे रायबरेलीशी चांगले संबंध आहेत कारण मी २० वर्षे तिथे काम केले आहे आणि ते नाते कधीही तुटणार नाही.”