[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
“सराव करत असताना, ब्रॉनी जेम्सला हृदयविकाराचा झटका आला,” असे प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे. ब्रोनीवर वैद्यकीय कर्मचार्यांनी उपचार केले आणि रुग्णालयात नेले. त्यांची प्रकृती आता स्थिर असून, अतिदक्षता विभागात (ICU) नाही. जेम्स कुटुंबासाठी तुम्ही सर्व प्रार्थना करत असाल, पण त्याचबरोबर त्यांचा आदर राखावा आणि अफवा कोणीही पसरवू नये. ब्रॉनीबाबतची सर्व माहिती आम्ही तुम्हाला यापुढेही देत राहू, असेही प्रवक्ताने यावेळी स्पष्ट केले आहे.
लेकर्स सुपरस्टार लेब्रॉन जेम्सचा मोठा मुलगा ब्रॉनी आहे., ट्रोजनसह बास्केटबॉल सराव दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने कोसळला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ब्रॉनी हा १८ वर्षांचा आहे आणि आता त्याला अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले होते आणि आता त्यांची प्रकृती चांगली आहे.
जेम्सने बास्केटबॉल या खेळात आपले नाव कमावले आहे. अव्वल पाच खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. एक दमदार कारकार्दीनंतर त्याने एक मोठा करार केला. त्यामुळे सध्याच्या घडीला चांगलाच प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर आपला मुलगा आता या खेळात नाव कमावेल, असे स्वप्न त्याने पाहिले होते. पण आता त्याच्या मुलाला हार्ट अटॅक आला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे. बास्केटबॉलचा सराव ब्रॉनी करत होती. त्याचा सराव उत्तम चालू होता. पण सराव करत असतानाच तो खाली कोसळला. पहिल्यांना नेमकं काय घडलं हे कोणालाच समजले नाही. पण कालांतराने त्याला हार्ट अटॅक आल्याचे समजले. त्यामुळे त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये त्याला थेट ICU मध्ये नेण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
[ad_2]