भारतीय वायुसेनेच्यावतीने अग्निवीरवायू पदाकरीता भरती मेळाव्याचे आयोजन

पुणे, दि. २२: भारतीय वायुसेनेच्यावतीने ३ एससी, एअरफोर्स स्टेशन, कानपूर (उत्तर प्रदेश) व ७ एससी क्र. १ कब्बन रोड, बेंगळुरु (कर्नाटक) येथे ३ ते १२ जुलै २०२४ या कालावधीत अग्निवीरवायू (संगीतकार) या पदाकरीता भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सैनिक कल्याण विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

अग्निवीरवायू या पदाकरीता अविवाहित भारतीय पुरुष आणि महिला उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या पदाकरीता २२ मे रोजी सकाळी ११ वाजता https://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु होणार असून ५ जून रोजी रात्री ११ वा. बंद होणार आहे. अर्ज करताना १०० रुपये अधिक वस्तु व सेवा कर नोंदणी शुल्क भरावे. उमेदवारांना तात्पुरत्या प्रवेशपत्रात नमूद केलेली तारीख, वेळ आणि ठिकाणी भरती रॅलीमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी दिली आहे
0000

Related posts