Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

February 3, 2026

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»देश - विदेश»सर्वोच्च न्यायालयाने ईडीला सुनावले… कायद्याने वागा, गुंडासारखे वागू नका!
देश - विदेश

सर्वोच्च न्यायालयाने ईडीला सुनावले… कायद्याने वागा, गुंडासारखे वागू नका!

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comAugust 12, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

दि.८:(सा. प्रगत भारत): सर्वोच्च न्यायालयाने ईडीला कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याचा कडक इशारा दिलाय. शिवाय, बदमाशांसारखे वागू नका. भामटेपणा सोडा, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने गुरुवारी (दि.7) ईडीला झाप झापलंय. न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्जल भूयान आणि एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने जुलै 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पुनर्विचार याचिकांवर सुनावणी सुरु असताना हे निरीक्षण नोंदवलं आहे. या केसमध्ये मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (PMLA) ED ला अटक, झडती आणि जप्तीचे अधिकार मान्य करण्यात आले होते.

या पुनर्विचार याचिका ग्राह्य धरण्यायोग्य नाहीत, कारण यामध्ये प्रत्यक्षात आधीच्या निकालाविरुद्ध छुप्या पद्धतीने अपील करण्यात आलंय, असा युक्तीवाद केंद्र सरकार आणि ED तर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) एस. व्ही. राजू यांनी केला. या प्रकरणातील गुन्हेगार चौकशी लांबवण्यासाठी कायदेशीर प्रकियेचा वापर करत आहेत. न्यायालयात एकामागून एक अर्ज दाखल करतात आणि त्यामुळे ED चे अधिकारी तपास करण्याऐवजी न्यायालयीन उपस्थितीवर वेळ घालवतात, असंही एस. व्ही. राजू न्यायालयात म्हणाले. त्यानंतर न्यायमूर्ती उज्जल भूयान यांनी ईडीचं दोष सिद्ध करण्याचं प्रमाण 10 टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचं सांगत ईडीला झापलं.

“तुम्ही गुन्हेगारासारखे वागू शकत नाही, तुम्हाला कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल. माझ्या एका निर्णयात मी निरीक्षण केले होते की गेल्या पाच वर्षांत ED ने सुमारे 5,000 ECIRs नोंदवले आहेत, पण दोषसिद्धी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. आम्हालाही ED च्या प्रतिमेबद्दल चिंता वाटते. 5-6 वर्षांच्या कोठडीनंतर लोक निर्दोष सुटले, तर जबाबदारी कोण घेणार?” असा सवालही न्यायमूर्तींनी केला.

ASG राजू पुढे म्हणाले की, काही ताकद असलेले आरोपी अनेकदा केमन आयलंडसारख्या परदेशी न्यायक्षेत्रात पळून जातात, त्यामुळे ईडी अडचणीत येते. तसेच 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाने PMLA च्या घटनात्मक वैधतेला आधीच मान्यता दिली असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. या पुनर्विचार याचिकांची पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमा. विरोधी पक्षनेते श्री विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त माउलीच्या मंदिराला देणगी
Next Article राहुल गांधींनी मतचोरी उघडी पाडून भाजपचा बुरखा फाडलाय, त्यांचं ढोंग-सोंग उघडं पाडलंय! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख…
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली…! राज्यात तीन दिवस दुखवटा; आजपासून प्रशासकीय सुट्टी जाहीर..

January 28, 2026

ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन

January 7, 2026

मागील पाच वर्षांत 9 लाख भारतीयांनी सोडले भारताचे नागरिकत्व-परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह

December 16, 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) मोठे यश

December 16, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

By pragatbharat@gmail.comFebruary 3, 20260

मुंबई (Pragatbharat.com):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे…

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

अजित पवारांना उद्या अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अंत्यसंस्कार

January 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.