Virendra Sehwag Harsh Tweet On Team India Defeat in WTC Final 2023; ‘मानसिकरित्या भारताने आधीच सामना गमावला जेव्हा… वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाला चांगलंच सुनावलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: सर्व भारतीयांच्या नजर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम सामन्यावर लागल्या होत्या. पण दुर्दैवाने यंदाही भारताला आयसीसी ट्रॉफीचे हे जेतेपद पटकावण्यात अपयश आले आहे. टीम इंडियाने आपली सुरुवात चांगली केली पण ती तशीच टिकवून ठेवण्यात संघाला अपयश आले. WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारूण पराभवानंतर टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या दहा वर्षांत टीम इंडियाला जेतेपदाच्या जवळ येऊनही अनेकदा पराभव पत्करावा लागला. या अंतिम सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा निराश केले.अखेर संघाला आणखी एक आयसीसी ट्रॉफी हातातून गमवावी लागली. या पराभवानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. खरेतर, कसोटीतील नंबर १ गोलंदाज रविचंद्रन अश्विनला मेगा सामन्यात बाहेर ठेवण्याचा निर्णयावर अनेक दिगज्जांनी प्रश्नचिन्ह उभारले. वीरेंद्र सेहवाग त्यापैकीच एक होता. टीम इंडियाच्या दारूण पराभवानंतर सेहवागचा राग अनावर झाला.

भारताने ते आधीच मानसिकरित्या…

त्याने ट्विट केले आणि म्हटले- WTC फायनल जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन. ते विजयास पात्र होते. भारताने ऑस्ट्रेलियाच्या डावखुऱ्या जोरदार आक्रमणाविरुद्ध अश्विनला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी आधीच मानसिकदृष्ट्या सामना गमावला होता. तसेच आघाडीच्या फलंदाजी फळीला चांगली फलंदाजी करणे आवश्यक होते. सेहवाग पुढे म्हणाला – चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी चांगली मानसिकता आणि दृष्टीकोन आवश्यक आहे.
आर अश्विन

रविचंद्रन अश्विन हा कसोटीतील नंबर १ गोलंदाज आहे. विशेष म्हणजे त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने २२ सामन्यांच्या ४२ डावात ११४ विकेट घेतल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट उत्तर दिले नसले तरी त्याने अश्विनला बाहेर ठेवण्यामागे सामन्यातील परिस्थितीचा हवाला दिला.

रवी शास्त्रींनी गियरच बदलला… WTC Final मध्ये पोहोचल्यावर रोहितबद्दल काय म्हणाले पाहा…

[ad_2]

Related posts