BCCI Gave a Clean Chit To Rohit Sharma-Rahul Dravid And Held The Trio Guilty ; रोहित-द्रविड यांना क्लीन चीट देत BCCI ने या तिघांना दोषी ठरवलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारताला विश्व अजिंक्यपद स्पर्धेत लाजीरवाणार पराभव पत्करवा लागला. हा पराभव कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यामुळे झाला नाही, तर या पराभवासाठी तीन प्रशिक्षक जबाबदार असल्याचे आता बीसीसीआयला वाटत आहे. त्यामुळे या तिघांवर आता कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी जगज्जेतेपदाच्या लढतीत भारतास एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या पराभवाची अंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात लवकरच बीसीसीआयच्या सहायक वर्गासह चर्चा अपेक्षित आहे. या बैठकीत प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या सहकाऱ्यांच्या कामगिरीचा नव्याने आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

‘जगज्जेतेपद लढतीतील पराभवाचे सखोल विश्लेषण होईल; पण सध्या तरी कोणालाही डच्चू दिला जाण्याची शक्यता कमी आहे. भारतीय क्रिकेट संघ या लढतीसाठी पात्र ठरला हे दुर्लक्षित करता येणार नाही,’ असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. मात्र, त्याच वेळी वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा जेमतेम चार महिन्यांवर आलेली आहे. हेही दुर्लक्षित करता येणार नाही, असेही काही पदाधिकाऱ्यांचे मत आहे. ‘भारतीय संघाच्या सहायक वर्गाने निराशा केली, असा निष्कर्ष काढणे अयोग्य होईल. मायदेशातील मालिकांत भारताने वर्चस्व राखले. कसोटी जगज्जेतेपदाच्या लढतीत प्रवेश मिळवला. हे खरे असले तरी परदेशात अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. वर्ल्ड कप चार महिन्यांवर असताना कठोर निर्णय घेणे अयोग्य होईल. मात्र, त्याच वेळी कामगिरीचे सखोल मूल्यमापन करण्यात येणार आहे,’ असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

राठोड, म्हाब्रेंवर टीका
फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड आणि गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांचे अपयश जास्त सलत आहे. राठोड यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून भारताच्या आघाडीच्या फलंदाजांची कामगिरी उंचावलेली नाही. आघाडीच्या सर्वच फलंदाजांच्या कामगिरीत चढउतार आहेत. परदेशात भारतीय फलंदाज धावांसाठी चांगलाच संघर्ष करीत आहेत, याकडे लक्ष वेधले जात आहे. भारत अरुण यांच्याऐवजी पारस म्हाम्ब्रे यांनी सूत्रे स्वीकारली. म्हाम्ब्रे गोलंदाज प्रशिक्षक झाल्यापासून भारतीय संघातील अनेक गोलंदाजांना तंदुरुस्तीचा प्रश्न भेडसावत आहेत. त्याचबरोबर भारतातील खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाज यशस्वी ठरले; पण परदेशात भारतीय गोलंदाजांनी क्वचितच वर्चस्व राखले आहे. आर. श्रीधर क्षेत्ररक्षक मार्गदर्शक असताना भारतीय संघांची सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघात गणना केली जात होती.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

टी. दिलीप यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून क्षेत्ररक्षणाचा दर्जा खालावला आहे. टी-२० वर्ल्ड कप, आशिया कप, कसोटी जगज्जेतेपद लढतीत हे प्रकर्षाने जाणवले, असे बीसीसीआयला वाटत आहे.

[ad_2]

Related posts