BCCI Ends Career Of Big Player Who Scored Half Century In IPL Final 2023 ; आयपीएल फायनल गाजवणाऱ्या खेळाडूला संघात स्थान नाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारताचा आज वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी संघ जाहीर करण्यात आला. पण यावर्षी आयपीएलची फायनल ज्या खेळाडूने गाजवली होती, त्याला मात्र या संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे बीसीसीआयने या खेळाडूचे करीअर संपवल्याचे पाहायला मिळत आहे.आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर बऱ्याच खेळाडूंना या भारतीय संघात स्थान मिळाले आहे. अजिंक्य रहाणेलाही विश्व अजिंक्यपद स्पर्धेत आयपीएलच्या जोरावर स्थान दिले होते. ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वालसारख्या खेळाडूंना आयपीएलच्या कामगिरीच्या जोरावरच भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. पण आयपीएलची फायनल गाजवणारा खेळाडू मात्र यावेळी उपेक्षितच राहिल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी आयपीएलची फायनल ही चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स या संघांत झाली होती. यावेळी गुजरातचा शुभमन गिल हा भन्नाट फॉर्मात होता. पण अंतिम फेरीत मात्र त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. गिल यावेळी ३९ धावांवर बाद झाला आणि गुजरातला मोठा धक्का बसला होता. पण त्याचवेळी गुजरातच्या संघाला या धक्क्यातून बाहेर काढले होते ते वृद्धिमान साहाने. साहाने यावेळी चेन्नईच्या गोलंदाजीवर कडक प्रहार केला आणि तडफदार अर्धशतक झळकावले होते. साहाने या सामन्यात ५४ धावांंची धडाकेबाज खेळी साकारली होती. या आयपीएलमध्येही साहाने सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. एकिकडे भारतीय संघाकडे अनुभवी यष्टीरक्षक नाही. त्यामुळे साहाला भारतीय संघात स्थान मिळेल, असे वाटत होते. विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत केएस भरतला यष्टीरक्षणाची संधी दिली आणि तो पुन्हा सपशेल अपयशी ठरला होता. त्यावेळी बऱ्याच जणांना साहाची आठवण आली होती. त्यामुळे साहाला आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात तरी संधी दिली जाईल, असे वाटत होते. पण बीसीसीआयने साहाला या दौऱ्यातही संधी दिली नाही. त्यामुळे आता साहाला यापुढेही भारतीय संघात स्थान मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बीसीसीआयने साहाची कारकिर्द संपवली, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे.

माझा नंबर बऱ्याच जणांकडे, पण कर्णधारपद सोडल्यानंतर फक्त धोनीचा मेसेज आला | विराट कोहली

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करूनही आता साहासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

[ad_2]

Related posts