[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
साक्षी आणि जीवा या दोघींचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. साक्षी आणि जीवा मॅच सुरु असताना सीएसएकेच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होत्या.
चेन्नईनं पहिल्यांदा फलंदाजी केली तेव्हा धोनी अखेरच्या षटकांमध्ये मैदानात उतरला होता. केवळं एक धाव केल्यानंतर तो बाद झाल्यानंतर साक्षी नाराज झाल्याचं दे खील पाहायला मिळालं. मात्र, चेन्नईनं विजय मिळवल्यानंत साक्षीनं लेकीसह जोरदार जल्लोष केला.
धोनीची लेक मैदानावर..
चेन्नईनं गुजरातला पराभूत करताच धोनीच्या पत्नीनं लेकीसह जल्लोष केला. त्यानंतर धोनीची लेक मैदानावर आल्याचं आयपीएलच्या अधिकृत अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत दिसून आलं. त्या व्हिडिओत धोनीच्या लेकीनं हार्दिक पांड्यानं हस्तोंदलन केलं. त्या व्हिडिओत धोनी लेकीला काही तरी सांगताना दिसत आहे.
चेन्नई दहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत, पाचव्या विजेतपदाची संधी
चेन्नई सुपरकिंग्जनं आतापर्यंत १४ आयपीएलमध्ये सहभाग घेतला आहे. आयपीएलच्या यंदाच्या पर्वात देखील सीएसकेनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्जनं गुजरातला पराभवाचा धक्का देत यंदाच्या आयपीएलमध्ये प्रवेश केला. ऋतुराज गायकवाडच्या खेळीच्या जोरावर चेन्नईनं १७२ धावा केल्या होत्या. १७३ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरातला पहिल्या पॉवर प्लेमध्ये धक्का बसला. शुभमन गिल आणि राशिद खान वगळता गुजरातच्या खेळाडूंना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
[ad_2]