[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ODI World Cup 2023, Round-robin Format : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाला अवघे आठ दिवस शिल्लक आहेत. पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने दहा संघामध्ये यंदाचा विश्वचषक होणार आहे. प्रत्येक संघाला 9 सामने खेळावे लागणार आहेत. वनडे क्रिकेट विश्वचषकात तिसऱ्यांदा राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा होत आहे. याआधी 2019 आणि 1992 मध्ये राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने विश्वचषक स्पर्धा झाली होती. 2019 मध्ये इंग्लंडने तर 1992 मध्ये पाकिस्तानने विश्वचषक उंचावला होता. यंदा कोणता संघ विश्वचषक उंचावणार, हे 19 नोव्हेंबर रोजी समजणार आहे.
राउंड रॉबिन फॉर्मेट काय आहे ?
राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने सर्वात आधी 1992 मध्ये विश्वचषक स्पर्धा झाली होती. राउंड रॉबिन पद्धत म्हणजे, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाची एकमेकांशी लढत होते. यात कोणत्याही संघाला कमी किंवा जास्त करता येत नाही. प्रत्येक संघाला त्यांची ताकद अजमावण्याची संधी मिळते. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान या संघांना दावेदार मानलं जात आहे. मात्र, बांगलादेश, अफगाणिस्तान अथवा इतर कोणताही कमकुवत संघ टॉप 4 मध्ये पोहचू शकतो. सेमीफायनलमध्ये पोहचल्यानंतर नॉकआऊट पद्धतीने सामने होतील. पहिल्या क्रमांकावर असणारा संघ चौथ्या स्थानावर असलेल्या संघासोबत खेळेल तर दुसऱ्या क्रमांकाचा संघ तिसऱ्या संघासोबत खेळेल. त्यानंतर विजेत्या दोन संघामध्ये फायनलचा थरार रंगेल.
राउंड रॉबिन पद्धतीमध्ये भारताची कामगिरी कशी आहे ?
राउंड रॉबिन पद्धतीने झालेल्या विश्वचषकात भारतीय संघाची कामिगिरी निराशाजनक आहे. 1992 मध्ये पहिल्यांदा राउंड रॉबिन स्पर्धा रंगली होती, तेव्हा भारतीय संघाला टॉप 4 मध्ये स्थान पटकावता आले नव्हते. तर 2019 मध्ये भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते. न्यूझीलंडने भारताचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. यंदा भारतामध्येच विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे, त्यामुळे टीम इंडिया कशी कामगिरी करतेय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सर्वाधिक आठ वेळा ग्रुप स्टेज आणि नॉकआउट पद्धतीने वर्ल्ड कप खेळवण्यात आला आहे. आतापर्यंत कोणत्या वर्षी कधी झाली स्पर्धा….
कधी | फॉर्मेट |
1975 ते 1987 पर्यंत | ग्रुप स्टेज आणि नॉकआउट |
1992 | राउंड रॉबिन आणि नॉकआउट |
1996 | ग्रुप स्टेज आणि नॉकआउट |
1999 ते 2003 पर्यंत | ग्रुप स्टेज आणि सुपर सिक्स |
2007 ते 2015 पर्यंत | ग्रुप स्टेज आणि नॉकआउट |
2019 | राउंड रॉबिन आणि नॉकआउट |
दहा संघ कोणते ?
भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरर्लंड हे दहा संघ यंदाच्या विश्वचषाकात एकमेकांसोबत भिडणार आहे.
आणखी वाचा :
World Cup 2023 : बांगलादेशचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, शाकीब अन् तमीम भिडले, जाणून घ्या नेमकं प्रकरण
World Cup 2023 Squad: भारत, पाकिस्तान ते इंग्लंड-ऑस्ट्रेलिया, 10 संघाचे शिलेदार भारतात, सर्व संघातील खेळाडूंची यादी
World Cup 2023 Schedule in Marathi : 10 संघ, 48 सामने; क्रिकेटच्या सर्वात मोठ्या महासंग्रामाचे वेळापत्रक एका क्लिकवर
World Cup 2023 : वर्ल्डकपआधीच कांगारुंना मोठा धक्का, मॅचविनर अष्टपैलू खेळाडू स्पर्धेबाहेर
𝗠𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝗪𝗼𝗿𝗹𝗱 𝗖𝘂𝗽 𝗕𝗲𝗴𝗶𝗻𝘀…. सराव सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, भारताचा सामना कधी ?
मालिका जिंकल्यानंतर रोहितने ट्रॉफीला हातही लावला नाही, हिटमॅनने असे का केलं? कारण..
[ad_2]