( प्रगत भारत । pragatbharat.com)
Gajkesari Yog: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. अशा स्थितीत प्रत्येक राशीमध्ये कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होताना दिसतो. यावेळी अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. ज्याचा 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच परिणाम होताना दिसतो.
मेष राशीमध्ये गुरू आणि चंद्राचा संयोग झाला आहे. ज्यामुळे गजकेसरी योग तयार झाला असून काही राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. पंचांगानुसार 21 डिसेंबर रोजी रात्री 10:09 वाजता चंद्र मेष राशीत प्रवेश केला आहे. यानंतर 23 डिसेंबर रोजी पहाटे 3:17 वाजता या राशीत राहणार आहे. गजकेसरी राजयोग हा सर्वात शुभ योगांपैकी एक मानला जातो. या राजयोगाच्या निर्मितीने काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे.
मेष रास (Mesh Zodiac)
या राशीच्या लोकांना गजकेसरी योगामुळे सर्वाधिक फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव वाढणार आहे. व्यवसायात मोठा करार होऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळू शकते. नोकरदार लोकांबद्दल बोलल्यास तुमच्या कामाचे कौतुक होईल.
कर्क रास (Kark Zodiac)
या राशीत दशम भावात गजकेसरी योग तयार होणार आहे. अशा स्थितीत या राशीचे लोक यश मिळवू शकतात. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षा स्पर्धेत अपेक्षित यश मिळू शकतं. आर्थिक लाभासोबत व्यावसायिक जीवनात अपार यश मिळणार आहे. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येतील.
कुंभ रास (Kumbh Zodiac)
कुंभ राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग फायदेशीर ठरू शकणार आहे. भाऊ आणि बहिणीसोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे खर्च टाळा. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ती करू शकता. अविवाहितांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. नशीब पूर्ण साथ मिळू शकणार आहे. कौटुंबातील वातावरण चांगल राहणार आहे. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)