Ratha Saptami 2024 : कधी आहे रथसप्तमी? केव्हापर्यंत करता येणार हळदीकुंकू समारंभ?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ratha Saptami 2024 :  हिंदू धर्मात सण आणि उत्सवाला अतिशय महत्त्व आहे. या वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीनंतर फेब्रुवारी महिन्यात येणारी रथ सप्तमीलाही तेवढच महत्त्व आहे. रथ सप्तमी ही दरवर्षी पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी करण्यात येते. रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणं शुभ मानलं जातं. रथ सप्तमीला भानु सप्तमी आणि अचला सप्तमी असंही म्हटलं जातं. घरात सुख, समृद्धी आणि संपत्तीत वाढ व्हावी शिवाय निरोगी आयुष्यासाठी या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. महाराष्ट्रात मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकूवाचा समारंभाच आयोजन केलं जातं. यंदा महिलांना केव्हापर्यंत हळदीकुंकू समारंभ करता येणार आहे. तसंच रश सप्तमीची पूजा, शुभ मुहूर्त आणि पूजा मांडणीबद्दल जाणून घेऊयात. (Haldi Kunku program that can be done till 16 February Ratha saptami 2024 date time shubh muhurat puja vidhi mantra and surya jayanti)

कधी आहे रथसप्तमी ?

पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी 15 फेब्रुवारीला सकाळी 10.12 वाजेपासून 16 फेब्रुवारी सकाळी 8.54 वाजेपर्यंत असणार आहे. पण उदय तिथीनुसार रथ सप्तमी ही 16 फेब्रुवारी साजरी केली जाणार आहे.

रथ सप्तमी 2024 स्नान मुहूर्त 

रथ सप्तमीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सकाळी 05:17 ते 06:59 या वेळेत स्नान करणे शुभ राहील.

रथ सप्तमी 2024 शुभ योग

रथ सप्तमी तिथीला अतिशय शुभ योग जुळून आला आहे. यादिवशी ब्रह्म योग दुपारी 3.18 पर्यंत असणार आहे. त्याशिवाय या दिवशी इंद्र योग असणार आहे. रथ सप्तमीला भद्रा स्वर्गात निवास करतो याचा लाभ पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांना होतो असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.

रथ सप्तमी 2024 पूजा विधी

या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला नमस्कार करा. त्यानंतर यादिवशी पवित्र नदीत स्नान करणं शुभ मानल जातं. यादिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करावेत. तर पाण्यात अक्षत, तीळ, रोळी आणि दुर्वा मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावा. यावेळी खालील मंत्रांचा जप करावा. 

‘ओम घ्रिण सूर्याय नम:’

“ओम सूर्याय नमः”

ये, सूर्या, तेजाचा सहस्त्रवा, विश्वाचा स्वामी.

हे देवी सूर्य माझ्यावर दया कर आणि माझे प्रसाद स्वीकार

यानंतर पंचोपचार करून विधीनुसार सूर्यदेवाची पूजा करा. यावेळी सूर्य चालीसा आणि सूर्य कवच पठण नक्की करा. शेवटी आरती करून सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा. पूजेनंतर वाहत्या पाण्याच्या प्रवाहात काळे तीळ अर्पण करा. तसंच गरीब आणि गरजूंना दान करा. काही जण यादिवशी उपवासही ठेवतात. 

रथसप्तमीच्या दिवशीसाठी सूर्य मंत्र 

ॐ घृ‍णिं सूर्य्य: आदित्य:
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ।
ॐ सूर्याय नम: ।
ॐ घृणि सूर्याय नम: ।
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।।
ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:।
ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्यः क्लीं ॐ

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts