Ind vs Eng 2nd Test update England spinner Jack Leach doubt for the second Test against India because of a knee injury sustained in the first Test

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ind vs Eng 2nd Test : दोन फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड (Ind vs Eng 2nd Test) संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे इंग्लंडचा (England) सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज जॅक लीच दुसऱ्या कसोटीत संघाचा भाग असणार नाही. दुसऱ्या कसोटीत 20 वर्षीय युवा फिरकी गोलंदाज शोएब बशीरला इंग्लंडकडून पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. बीबीसी स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, जॅक लीचला बरे होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. जॅक लीच या मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये भाग घेऊ शकेल की नाही हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, इंग्लंडने अद्याप जॅक लीचच्या जागी संघात स्थान देण्याची घोषणा केलेली नाही.

जॅक लीचच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याचा दावा बीबीसी स्पोर्ट्स रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. जॅक लीच बुधवारी सरावासाठी मैदानावर पोहोचला नाही. भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी जॅक लीचला ही दुखापत झाली. मात्र असे असतानाही जॅक लीचने सामन्यात उतरला होता. इंग्लंडच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. आता इंग्लंड संघाला जोखीम घेणे टाळायचे आहे आणि जॅक लीचला सावरण्यासाठी पूर्ण वेळ दिला जाईल. व्हिसा मिळाल्यानंतर शोएब बशीर भारतात पोहोचला असून तो दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता आहे.

जॅक क्राऊली तंदुरुस्त होण्याची इंग्लंडला आशा 

इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉलीही दुखापतीशी झुंजत आहे. पण कर्णधार बेन स्टोक्सने जॅक क्राऊलीबद्दल अपडेट जारी केले आहे. बेन स्टोक्सचे म्हणणे आहे की, क्राऊली अजून दुसरी कसोटी खेळण्याच्या शर्यतीत आहे. बेन स्टोक्स म्हणाला, “क्रॉली कठीण आहे.” आम्हाला आशा आहे की तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकेल. जॅकबद्दलहीअसेच म्हणता येणार नाही. अजून काही दिवस काय होते ते पाहावे लागेल.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts