MPL 2023 Cricket Live Scores Matches Fixtures Teams Maharashtra Ruturaj Gaikwad Kedar Jadhav MPL 2023 Matches Free

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MPL 2023 :  महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेला गुरुवारी सुरुवात होणार आहे. एमसीएच्या पुण्यातील स्टेडियमवर पुणेरी बाप्पा-कोल्हापूर टस्कर्स लढतीने स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. पुण्याचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे तर कोल्हापूर संघाची धुरा केदार जाधव याच्या खांद्यावर आहे. सहा संघ 14 दिवस लढणार आहेत.. 19 सामन्यानंतर एमपीएलचा पहिला विजेता मिळणार आहे. एमपीएलचे सर्व सामने मोफत पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने याबाबत अधिकृत माहिती दिली. 

पुणेरी बाप्पा, कोल्हापूर टस्कर्स, ईगल नाशिक टायटन्स, छत्रपती संभाजी किंग्ज, रत्नागिरी जेट्स आणि सोलापूर रॉयल्स हे सहा संघ साखळी (लीग फॉरमॅट) पद्धतीने एकमेकांशी झुंजणार असून गुरुवार दिनांक 29 जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने पुण्याजवळील गहुंजे येथील एमसीएच्या स्टेडियमवर खेळविले जाणार असून दुपारी 2 व रात्री 8 वाजता सामने होणार आहेत. स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी सर्व प्रेक्षकांना विनामूल्य मुक्त प्रवेश असून टेलिव्हिजनवरून दूरदर्शन डीडी वाहिनीवर, तसेच फॅनोड या स्ट्रीमिंगवरूनही हे सामने पाहता येणार आहेत.

रंगतदार प्रारंभ –
ऋतुराज गायकवाडचा पुणेरी बाप्पा आणि केदार जाधवचा कोल्हापूर टस्कर्स या संघांमध्ये उद्या रात्री 8 वाजता उद्घाटनाची लढत रंगणार आहे. अनुभवी नौशाद शेख व अंकित बावणेसह सचिन धस, साहिल औताडे असे युवा खेळाडू असलेल्या कोल्हापूर संघासमोर संतोष जेधे यांचे मार्गदर्शन लाभलल्या पुणे संघाचे आव्हान असणार आहे. पुणे संघात ऋतुराजसह यष्टिरक्षक सूरज शिंदे, पवन शाह, यश क्षीरगासर व अष्टपैलू रोहन दामले यांचा समावेश आहे. पहिल्या सामन्यापूर्वी दुपारी 5.30 वाजता शानदार उद्घाटन सोहळ्याने स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या सोहळ्यात अमृता खानविलकरसह अनेक तारे-तारकांचा समावेश आहे. 

खेळाडूंसाठी व्यासपीठ
एमपीएल स्पर्धेमुळे महाराष्ट्राच्यातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ मिळणार असून त्यांच्यासाठीच ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे, असे सांगून एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले. बीसीसीआयकडून या स्पर्धेसाठी आम्हाला छोटासा कालावधी मिळाला आहे. परंतु विविध फ्रेंचाइजींकडून, संघमालकांकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे आम्ही ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करीत आहोत. युवा खेळाडूंसाठी हे आदर्श व्यासपीठ ठरेल, असे रोहित पवार म्हणाले.

आयकॉन खेळाडू
या स्पर्धेपूर्वी प्रत्येक संघाने एका आयकॉन खेळाडूची निवड केली आहे. प्रवीण मसालेवाले यांच्या मालकीच्या पुणे संघाने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडची निवड केली आहे. पुनीत बालन यांच्या मालकीच्या कोल्हापूर संघाने विश्वचषक संघातील केदार जाधवची, ईगल इंडिया इन्फ्रा यांच्या मालकीच्या नाशिक संघाने आंतरराष्ट्रीय खेळाडू राहुल त्रिपाठीची निवड केली आहे. वेंकटेश्वरा हॅचरीजच्या मालकीच्या छत्रपती संभाजी किंग्ज संघाने 19 वर्षांखालील राजवर्धन हंगर्गेकरची, तर कपिल सन्स एक्सप्लोसिव्हज एलएलपी यांच्या मालकीच्या सोलापूर रॉयल्स संघाने युवा विकी ओस्तवालची, तर जेटसिंथेसिस याच्या मालकीच्या रत्नागिरी संघाने अझिम काझीची निवड केली आहे.  

एमपीएलचे संपूर्ण वेळापत्रक –

15 जून 2023 – 
पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)

16 जून 2023 – 
ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (दुपारी- 2 ते 5.20)
रत्नागिरी जेट्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)

17 जून 2023-
कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
 
18 जून 2023- 
ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (दुपारी – 2 ते 5.20)
पुणेरी बाप्पा विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)

19 जून 2023- 
पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)

20 जून 2023-
सोलापूर रॉयल्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी- 2 ते 5.20)
रत्नागिरी जेट्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)

21 जून 2023- 
ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)

22 जून 2023- 
छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी – 2 ते 5.20)
पुणेरी बाप्पा विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)

23 जून 2023- 
सोलापूर रॉयल्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)

24 जून 2023-
पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (दुपारी – 2 ते 5.20)
कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)

26 जून 2023- क्वालिफायर 1
27 जून 2023- एलिमिनेटर
28 जून 2023- क्वालिफायर 2
 29 जून2023 – अंतिम सामना

[ad_2]

Related posts