England vs Australia Ashes 2023 Day 5 Will Be Result Of 1st Test ; इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा Ashes कसोटी सामना रंगतदार स्थितीत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना चांगलाच रंगतदार अवस्थेत आहे. त्यामुळे सामन्याच्या पाचव्या दिवशी कोणता संघ बाजी मारू शकतो, याची उत्सुकता सर्वांना असेल. इंग्लंडने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी २८१ धावांचे आव्हान ठेवले असून त्यांची चौथ्या दिवसअखेर ३ बाद १०७ अशी स्थिती आहे. त्यामुळे इंग्लंडला जिंकण्यासाठी आता सात विकेट्सची गरज आहे, तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७४ धावांची गरज आहे.इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या दिवशीचा खेळ चांगलाच रंगला. कारण या दिवशी बऱ्याच घडामोड घडल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडला या सामन्याच्या पहिल्या डावात फक्त सात धावांची आघाडी घेता आली. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ दमदार फलंदाजी करेल आणि चौथा दिवस खेळून काढेल, असे सर्वांना वाटत होते. पण तसे घडले नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी इंग्लंडचे कंबरडे मोडल्याचे पाहायला मिळाले. कारण या दोघांनी प्रत्येकी ४ विकेट्स मिळवले आणि इंग्लंडला मोठी धावसंख्या रचण्यापासून रोखले.

इंग्लंडला या चौथ्या दिवशी चांगली फलंदाजी करता आली नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला यावेळी अर्धशतक पूर्ण करता आले नाही, यावरून इंग्लंडची फलंदाजी नेमकी कशी झाली ते समजता येऊ शकेल. इंग्लंडला एकामागून एक धक्के बसत गेले आणि त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. इंग्लंडकडून जो रुट आणि हॅरी ब्रुक यांनी प्रत्येकी ४६ धावा केल्या. कर्णधार बेन स्टोक्सने यावेळी ४३ धावांची खेळी साकारली. पण यावेळी एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि त्यांच्यामध्ये मोठी भागीदारी झाल्याचेही पाहायला मिळाले नाही. त्यामुळे इंग्लंडला यावेळी दुसऱ्या डावात २७३ धावा करता आल्या.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

इंग्लंडच्या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया या सामन्यात वरचष्मा राखेल असे वाटत होते. पण अखेर वॉर्नर बाद झाला आणि त्यानंतर त्यांचाही डाव थोडासा अडचणीत आला. ऑली रॉबिन्सनने वॉर्नरला ३६ धावांवर असताना बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर ख्रिस ब्रॉडने मार्नस लाबुशेन आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांनाही बाद केले. त्यामुळे सामन्यांची रंगत अजून वाढली. त्यामुळे आता हा सामान जिंकण्याची इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला समान संधी आहे.

[ad_2]

Related posts