[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
क्रिकेट सामन्यांच्या पोलीस बंदोबस्ताचे दर कमी करण्यात आले आहेत. सर्वसामान्यांसाठी महागाई वाढत असताना राज्य सरकार क्रिकेट सामान्यांच्या आयोजकांना मात्र दिलासा मिळाला आहे. क्रिकेट सामान्यांसाठी सुरक्षा पुरविण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात कमालीची घट करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाकडून संबंधित निर्णयावर एक परिपत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, नागपूर, पुणे आणि नवी मुंबई येथे क्रिकेटचे सामने भरवले जातात याठिकाणी आकारण्यात येणारे शुल्क वेगवेगळे होत. परंतु आता या निर्णयानंतर महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये एकच रक्कम आकारण्यात येणार आहे. या क्रिकेट सामान्यांसाठी पुरवल्या जाणाऱ्या पोलीस बंदोबस्ताचे दर राज्य शासनाकडून निश्चित करण्यात आले आहेत.
आताचे दर?
यामध्ये आयपीएल/आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यासाठी १० लाख प्रतिसामना दर असणार आहे.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी २५ लाख दर आकारले जाणार आहे.
कसोटी सामन्यांसाठी (५ दिवस) २५ लाख दर आकारला जाणार आहे.
पूर्वीचे दर?
यापूर्वी आयपीएल/आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी दर ७० लाख होता तर उर्वरित महाराष्ट्रात ५० लाख रुपये आकारला जात होता. तसेच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी मुंबईत दर ७५ लाख तर राज्यात इतरत्र ५० लाख आकारले जात होते. कसोटी सामन्यासाठी मुंबईत ६० लाख तर इतरत्र महाराष्ट्रात ४० लाख आकारले जात होते.
[ad_2]