SRH vs RCB Score Live Updates marathi Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore IPL 2023 Live streaming ball by ball commentary

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2023, Match 65, SRH vs RCB : सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद येथे खेळवला जाईल. हा सामना जिंकून आरसीबीला प्लेऑफच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकायचं आहे. तर हैदराबाद शेवट विजयाने करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

बंगळुरू -हैदराबाद हेड टू हेड

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आतापर्यंत 21 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये हैदराबादनं 12 तर बंगळुरूनं 9 सामने जिंकले आहेत. एकंदरीत, हैदराबादचा आरसीबीवर वरचष्मा आहे. आज या दोन्ही संघांमध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे.

हैदराबाद जिंकल्यास आरसीबी पेचात 

हैदराबाद आयपीएल 2023 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर गेला आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे हैदराबादचं प्लेऑफचं स्वप्न यापूर्वीच भंगलं आहे. अशा परिस्थितीत अॅडम मार्करामच्या नेतृत्वाखाली एसआरएच अंतिम चारमध्ये खेळण्याचं आरसीबीचं स्वप्न भंग करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. या सीझनमध्ये SRH च्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार वगळता बाकीचे गोलंदाजही अडचणीत आले आहेत. 

हैदराबादच्या खेळपट्टीचा अहवाल?

राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मदत करते. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंची मोठी भूमिका असते. सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ यांच्यात झालेल्या शेवटच्या सामन्यात या मैदानावर 367 धावा झाल्या होत्या आणि फक्त 9 विकेट्स पडल्या होत्या.

आकडे काय सांगतात?

राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 69 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 30 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं मैदानात धडक मारली आहे. त्याचबरोबर 39 सामन्यांमध्ये विजयाचा पाठलाग करणाऱ्या संघाच्या हातात आहे. हैदराबादच्या घरच्या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 159 आहे. 

प्लेऑफच्या दृष्टीनं आरसीबीसाठी हा सामना महत्त्वाचा 

विशेष म्हणजे, RCB चा संघ 12 सामन्यांत 6 विजय आणि 12 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. हा सामना जिंकून बंगळुरूला प्लेऑफच्या आणखी जवळ जायचं आहे. RCB पुढचे दोन्ही सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरू शकते. 

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) ‘जिओ सिनेमा’ ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

[ad_2]

Related posts