[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
या समुहाचे समन्वयक, हेलेना मालेनो गार्झोन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून रोजी दोन बोटी १०० लोकांना घेऊन सेनेगलहून निघाल्या. तर तिसरी बोट २०० जणांसह चार दिवसांनी निघाली. हे लोक बोटींसह समुद्रात बेपत्ता झाले आहेत. हे सामान्य नाही, त्यांना शोधलं पाहिजे. त्यांचा शोध घेण्यासाठी आम्हाला आणखी काही विमानांची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.
या बोट निघाल्यापासून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. युरोपियन देश स्पेन आणि पश्चिम आफ्रिकी देश सेनेगलच्या अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, अशीही माहिती आहे.
बेपत्ता झालेले लोक अटलांटिक महासागरामार्गे स्पेनला जाण्यासाठी निघाले होते. जो जगातील सर्वात धोकादायक सागरी मार्गांपैकी एक आहे. याच मार्गावरुन गेल्या सहा महिन्यात ८०० जण बेपत्ता किंवा मृत झाले आहेत, यावरुन हा मार्ग किती धोकादायक आहे याचा अंदाज लावता येतो.
अलिकडच्या काळात हा धोकादायक मार्ग देशातील कॅनरी बेटांवर जाण्यासाठी मुख्य मार्गांपैकी एक बनला आहे. २०२० मध्ये याच मार्गावरुन २३००० हून अधिक स्थलांतरित आले होते. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत ७००० हून अधिक स्थलांतरित आले आहेत. स्थलांतरितांना स्पेनमध्ये आणणाऱ्या बोटी प्रामुख्याने मॉरिटानिया, मोरोक्को आणि पश्चिम सहारा या आफ्रिकन देशांमधून येतात. सेनेगलहून फार कमी बोटी येत असल्या तरी जूनपासून किमान १९ बोटी सेनेगलहून कॅनरी बेटांवर आल्या आहेत, अशी माहिती स्पेनच्या गृह मंत्रालयाने दिली आहे.
हे असे देश आहेत ज्यांची अर्थव्यवस्था घसरत चालली आहे, जिथे रोजगराची कमतरता आहे, अतिरेक्यांचा हिंसाचार वाढत आहे, राजकीय अशांतता आहे आणि हवामान बदलासह अनेक घटक लोकांच्या अडचणी वाढवत आहेत. या कारणांमुळे ते आपली घरं सोडून आणि कॅनरी बेटांवर वास्तव्य करण्यासाठी अशा धोकादायक मार्गांचा वापर करतात, अशीही माहिती आहे.
[ad_2]