[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना हा १२ जुलैला सुरु होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. तर संध्याकाळी ७ वाजता या सामन्याची नाणेफेक होईल. या सामन्याचे पहिले सत्र रात्री ९.३० पर्यंत चालेल, त्यानंतर दुसरे सत्र १०.१० वाजता सुरू होईल, जे रात्री १२.१० पर्यंत चालेल. तिसरे आणि शेवटचे सत्र १२.३० वाजता सुरू होईल आणि पहाटे २.३० पर्यंत चालेल. या वेळेत पूर्ण ९० षटके खेळली तर ठीक नाहीतर सामना आणखी काही काळ वाढवला जाऊ शकतो. पण तीन वाजेपर्यंत दिवसाचा खेळ संपेल, अशी माहिती आता समोर येत आहे. पण या सामन्यात पाऊस नेमका कधी पडणार, याचे अपडेट्स आता समोर आले आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १२ जुलैला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पाऊस पडणार नाही आणि वातावरण कोरडे असेल. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये चांगला खेळ होऊ शकतो. पण त्यानंतर सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामन्याच्या अखेरच्या दोन दिवसांमध्ये खेळ होणार की नाही, याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कसोटीत सामन्यात पाचपैकी तीन दिवस पाऊस पडणार आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीत तीन दिवस पावसाचे असणार आहेत. त्यामुळे आता ही कसोटी कशी होणार, याची चिंता चाहत्यांना लागलेली आहे.
[ad_2]