What Is Icc Plan ODI Cricket Future Of In Danger Will Fifty Over Game End : आणखी फक्त ४ वर्ष त्यानंतर कधीच खेळला जाणार नाही क्रिकेटमधील हा फॉर्मेट; २०२७ नंतर बंद होणार…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: जगभरात टी-२० क्रिकेटची क्रेझ वेगाने वाढत आहे. जगातील विविध देशात आता टी-२० लीगची सुरुवात झाली असून त्याची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. आता क्रिकेटमधील नियम निश्चित करणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबने आयसीसीच्या वनडे फॉर्मेटबद्दल एक मोठा आणि महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

MCCच्या मते २०२७ नंतर वनडे क्रिकेटमधील द्विपक्षीय मालिका बंद केल्या जाव्यात. जगभरात टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच आणि लीग क्रिकेट वाढले आहे. ते पाहता वनडेमध्ये आता द्विपक्षीय मालिकेला काही जागा शिल्लक नाही. एमसीसीच्या काही सदस्यांचे असे देखील मत आहे की २०२३च्या वनडे वर्ल्डकपनंतर वनडे क्रिकेटची कमी झालेली लोकप्रियता वाढण्यास मदत होईल.

एक वेळ अशी होती जेव्हा वनडे क्रिकेट फार लोकप्रिय होते. पण टी-२० क्रिकेट आल्यानंतर वनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाली. एका बाजूला एमसीसीचे असे म्हणणे आहे की कसोटी क्रिकेट त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे, कारण अनेक देश पाच दिवसांचे क्रिकेट खेळण्यास उत्सुक नाहीत.

झिम्बाब्वे सारख्या गरीब आणि छोट्या देशात क्रिकेट वाचवणे अधिक आव्हानात्मक आहे. बोर्डाकडे पैसे नसने ही मोठी अडचण आहे. यामुळेच त्यांनी २०१७ मध्ये असा निर्णय घेतला होता की जास्ती जास्त मॅच देशाबाहेर खेळायच्या.

एका आकडेवारीनुसार करोनानंतर चाहते वनडे क्रिकेट पाहण्यास फार उत्सुक नाहीत. टी-२० क्रिकेट ३ ते ४ तासात संपते. त्याचे प्रसारण करणे सोपे पडते. उटल वनडेसाठी ८ ते ९ तास लागतात. यामुळे ब्रॉडकास्टरांचा देखील रस कमी झाला आहे. अशा सर्व कारणांमुळेच एमसीसीने वनडे द्विपक्षीय मालिका बंद करण्याचा सल्ला दिला आहे.

भारतात या वर्षाच्या अखेरीस म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयसीसी वनडे वर्ल्डकप होणार आहे. या वर्ल्डकपची उत्सुकता असतानाच मेरिलबोन क्रिकेट क्लबने दिलेला हा सल्ला समोर आला आहे. आता आयसीसी यावर नेमका काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वनडे क्रिकेटची लोकप्रियता टिकवण्यासाठी भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने या फॉर्मेटमध्ये दोन सत्र करण्याची सूचना केली होती.

[ad_2]

Related posts