LSG Vs KKR IPL 2023 Kolkata Knight Riders Look To Stay In Reckoning Lucknow Super Giants Target Playoffs Berth 2023 Ipl Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

LSG vs KKR, IPL 2023 Match 67 : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघासोबत होणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर (Eden Garden Stadium) आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. प्लेऑफमध्ये (IPL 2023 Playoffs) स्थान मिळवण्यासाठी हा सामना जिंकणं लखनौ संघासाठी आवश्यक आहे. कोलकाता संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा कायम असली तरी, केकेआर संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आजच्या सामन्याच्या निकालावर प्लेऑफच्या शर्यतीत असणाऱ्या संघांचं भविष्यही अवलंबून आहे.

KKR vs LSG Match Preview : कोलकाता विरुद्ध लखनौ

लखनौ सुपर जायंट्स  (Lucknow Super Giants) संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघ सातव्या क्रमांकावर आहे. लखनौ संघाने (Lucknow Super Giants) यंदाच्या हंगामात खेळलेल्या 13 सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच कोलकाता (Punjab Kings) संघाने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पण संघाचा नेट रनरेट खूप कमी असल्यामुळे संघ गुणतालिकेत खाली आहे.

KKR vs LSG Head to Head : हेड टू हेड आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघामध्ये दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये लखनौ संघाचं पारड जड आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने दोन्ही सामन्यांमध्ये कोलकाताचा पराभव केला आहे. केकेआर संघाला मात्र लखनौ विरोधात एकही सामना जिंकता आलेला नाही.

KKR vs LSG, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनौ सुपर किंग्स (LSG) यांच्यात आज, 20 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) ‘जिओ सिनेमा’ ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

CSK vs DC Match Preview : चेन्नई प्लेऑफमध्ये पोहचणार की दिल्ली मार्ग खडतर करणार? हेड टू हेड आकडेवारी काय सांगते पाहा

[ad_2]

Related posts