[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
‘बॅस्टिल डेच्या या ऐतिहासिक प्रसंगी, पॅरिसमधील संचलनामध्ये सहभागी झालो. यानिमित्त करण्यात आलेले प्रेमळ स्वागत आणि मला दिलेल्या सन्मानाबद्दल मनःपूर्वक आभार. भारत आपल्या शतकानुशतके जुन्या नीतिमत्तेने प्रेरित होऊन आपली पृथ्वी शांत, समृद्ध आणि शाश्वत करण्यासाठी शक्य ते सर्व काही करण्यास वचनबद्ध आहे. एक मजबूत आणि विश्वासू भागीदार असल्याबद्दल १.४ अब्ज भारतीय फ्रान्सचे नेहमीच ऋणी राहतील. हे बंध अजून दृढ होवोत,’ असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी संचलनाच्या छायाचित्रांसह केले आहे.
‘भारत जागतिक इतिहासातील एक दिग्गज, भविष्यात निर्णायक भूमिका बजावणारा, एक धोरणात्मक भागीदार आहे. चौदा जुलैच्या संचलनामध्ये भारताचे सन्माननीय अतिथी म्हणून स्वागत करताना आम्हाला अभिमान वाटतो,’ असे ट्वीट फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी केले. ‘पहिल्या महायुद्धात फ्रेंच सैन्यासोबत लढणाऱ्यांच्या स्मृतीचा आम्ही आदर करतो. आम्ही त्यांना कधीही विसरणार नाही,’ असे अन्य एक ट्वीट करून मॅक्रॉन यांनी भारतीय सैन्याला अभिवादन केले.
‘सारे जहाँ से अच्छा…’
भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या तीन तुकड्या बॅस्टिल डे परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या. या तुकड्यांनी ‘सारे जहाँ से अच्छा…’ या गीताच्या धूनवर संचलन केले. परेडमध्ये भारताचा लष्करी बँडही सहभागी झाला होता. भारतीय सैन्य दलाचे नेतृत्व पंजाब रेजिमेंटने राजपुताना रायफल्स रेजिमेंटसह केले.
फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी पुरस्कार अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने सन्मानित झालेले मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. पॅरिस येथील एलिसी पॅलेसमध्ये हा सन्मान स्वीकारून मोदी हे दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला, किंग चार्ल्स (तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स), जर्मनीच्या माजी चॅन्सेलर अँजेला मर्केल; तसेच अन्य जागतिक नेत्यांच्या पंक्तीत सामील झाले.
[ad_2]