Mumbai Indians Tim David Smashes 48 Runs in Just 21 Balls in MI New York vs Los Angeles Knight Riders Watch Video; मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाची अमेरिकेतही धाकड फलंदाजी, सलग दुसऱ्या सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: सध्या अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट खेळले जात आहे. या टी-२० लीगमधील सहा संघांपैकी तीन संघ आयपीएलमधील संघ मालकांचे आहेत ज्यांनी वेगवेगळ्या फ्रँचायझी विकत घेतल्या आहेत. भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी झालेल्या स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात एमआय न्यूयॉर्कने लॉस एंजेलिस नाइट रायडर्सचा एकतर्फी पराभव केला. मुंबई इंडियन्ससाठी खालच्या फलित दमदार फलंदाजी करणाऱ्या या खेळाडूने या सामन्यातही आपली चमकदार कामगिरी दाखवली. प्रथम फलंदाजी करताना टीम डेव्हिडने एमआयकडून शानदार खेळी केली. सिंगापूरमध्ये जन्मलेल्या ऑस्ट्रेलियन वंशाच्या टीम डेव्हिडने २१ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्यामुळे एमआय न्यूयॉर्कने प्रथम फलंदाजी करताना नाइट रायडर्सविरुद्ध ८ बाद १५५ धावा केल्या.

४ चौकार आणि ४ षटकारांची शानदार इनिंग

सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला टीम डेव्हिड १३व्या षटकात केवळ ७७ धावांवर एमआय न्यूयॉर्कचा पाचवा विकेट गमावला तेव्हा तो क्रीजवर आला. क्रीजवर असलेला निकोलस पूरनही लगेच बाद झाला. एका टोकाकडून विकेट पडत राहिल्या, पण डेव्हिड दुसऱ्या टोकाकडून खंबीरपणे उभा राहिला. शेवटच्या दोन षटकांमध्ये त्याने गिअर्स बदलले आणि सातपैकी पाच वेळा चेंडू सीमापार पाठवला. डेव्हिडने ४८ धावांच्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार लगावले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २२८.५७ होता.
गेल्या सामन्यात अर्धशतक..

मेजर लीग क्रिकेट स्पर्धा नुकतीच सुरू झाली आहे परंतु पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स फ्रँचायझीची एमआय न्यूयॉर्क त्यांच्या पूर्ण क्षमतेने खेळत असल्याचे दिसते. पहिल्याच सामन्यात टीम डेव्हिडने अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर त्याने सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सविरुद्ध २८ चेंडूत ५३ धावांचे नाबाद अर्धशतक झळकावले. त्या सामन्यात डेव्हिडच्या बॅटमधून ४ चौकार आणि ४ षटकार पाहायला मिळाने, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. टीम डेव्हिड हा टी-२० स्पेशालिस्ट मानला जातो. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना त्याला त्याच्या उंच उंचीचा फायदाही होतो.

मुंबई इंडियन्सच्या प्लेअर्सनी गायलं कैलाश खेरचं गाणं

[ad_2]

Related posts