Rohit Sharma Break MS Dhoni’s Big Record In International Cricket ; रोहित शर्माने मोडला धोनीचा मोठा विक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पटकावले मानाचे स्थान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पोर्ट ऑफ स्पेन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ऐतिहासिक १०० वा सामना रोहित शर्मासाठी चांगलीच लकी ठरला. कारण या सामन्यात रोहितच्या शिरपेताच बरेच मानेच तुरे खोवले गेले आहेत. रोहितने या सामन्यात ८० धावांची खेळी साकारली. पण बाद होण्यापूर्वी रोहितने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

रोहित शर्माच्या नावावर ४४३ आंतरराष्ट्रीय सामने आहेत, या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या अर्धशतकांसह १७, ३०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये धावा करण्यात रोहित आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे चार फलंदाज आहेत, ज्यामध्ये फक्त विराट कोहली सक्रिय आहे तर तीन खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये १७, २६६ धावा केल्या होत्या. धोनीने ५३५ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आणि आता भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये धावा करण्याच्या बाबतीत तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. कारण रोहितने त्याचा हा मोठा विक्रम मोडीत काढला आहे आणि रोहित आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. सचिनने ६६४ सामन्यांमध्ये ३४, ३५७ धावा केल्या आहेत ज्यात १०० शतकांचा समावेश आहे. माजी कर्णधार विराट कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत भारतासाठी एकूण ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर २५, ६४१ धावा आहेत. टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहेत. राहुल द्रविड यांनी टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०४ सामन्यांमध्ये २४, ०६४ धावा केल्या आहेत.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

याशिवाय माजी कर्णधार सौरव गांगुली या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. सौरव गांगुली यांनी भारतीय संघासाठी एकूण ४२१ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी १८, ४३३ धावा केल्या आहेत. मात्र, आता रोहित शर्माचे पुढील लक्ष्य गांगुलीचा हा आकडा पार करणे असेल.

[ad_2]

Related posts