[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा १०० वा कसोटी सामना असेल. त्यामुळे या सामन्याला अति महत्व आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी रोहित शर्मासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक सामना सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माचे मनोबल कमालीचे उंचावले असेल. रोहितने पहिल्या कसोटीत शतक झळकावले होते. त्यानंतर आता या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी रोहितसाठी आनंदाची बातमी आली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा ऐतिहासिक कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी आयसीसीने एक मोठी गोष्ट जाहीर केली आहे. आयसीसीने हा ऐतिहासिक सामना सुरु होण्यापूर्वी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत रोहित शर्मा हा भारताचा असा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे की ज्याने अव्वल १० फलंदाजांच्या यादीत स्थान पटकावले आहे. रोहित शर्मा यापूर्वी १३ व्या स्थानावर होता. पण पहिल्या कसोटी सामन्यात रोहितने शतक झळकावले होते, त्याचा फायदा त्याला या क्रमवारीत झाला आहे. रोहितने यावेळी तीन स्थानांची झेप घेतली आहे आणि तो आता आयसीसीच्या कसोटी क्रमवारीच्या फलंदाजांच्या यादीत आता १० व्या स्थानावर पोहोचला आहे. रोहितचे या क्रमवारीत ७५१ गुण आहेत. या यादीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन हा अव्वल स्थानावर विराजमान आहे. या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा बाबर आझम आहे, तर तिसरे स्थान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने पटकावले आहे. या यादीत पहिल्या १० फलंदाजांमध्ये रोहितचा अपवाद वगळता भारताचा एकही फलंदाज नाही.
भारतीय संघ गेल्या काही महिन्यांपासून कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळेच ते विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. पण या अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
[ad_2]