West Indies India 2nd Test Queens Park Oval Port Of Spain Trinidad Ind Vs Wi Day Report

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs WI 2nd Test, 4th Day Report : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु आहे. दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचलाय.  चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 32 षटकांत 2 बाद 76 धावांपर्यंत मजल मारली. भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आता शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजला 289 धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला विजयासाठी 8 विकेट्स घ्याव्या लागतील. तत्पूर्वी, भारताने 2 बाद 179 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. भारताकडून इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी अर्धशतके झळकावली.

वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेट आणि कर्क मॅकेन्झी यांना बाद करण्यात भारताला यश आलेय. या दोन्ही फलंदाजांना ऑफस्पिनर रवी अश्विनने याने तंबूचा रस्ता दाखवला. क्रेग ब्रॅथवेटने 52 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. तर मॅकेन्झी एकही धाव न काढता पायचीत झाला.  चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर  चंद्रपॉल आणि ब्लॅकवूड नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले. तेगनारायण चंद्रपॉल २४ धावा करून खेळत आहे. ब्लॅकवूड 20 धावा करून नाबाद परतला.

त्यापूर्वी, भारताने 2 बाद 179 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजला सामना जिंकण्यासाठी 365 धावांचे लक्ष्य दिले.  दुसऱ्या डावात भारतासाठी कर्णधार रोहित शर्माशिवाय इशान किशनने अर्धशतकी खेळी केली.  रोहित शर्माने 44 चेंडूत 57 धावांची खेळी केली. तर इशान किशन 34 चेंडूत 52 धावा करून नाबाद परतला. वेस्ट इंडिजकडून शॅनन गॅब्रिएल आणि जोमेल वॅरिकन यांना 1-1 असे यश मिळाले. त्याचवेळी, याआधी भारताने पहिल्या डावात 438 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 255 धावांवर आटोपला. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने नेत्रदीपक गोलंदाजी सादर केली. मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात 5 खेळाडूंना तंबूत पाठवले होते. 

 

सिराजचा भेदक मारा, विडिंजचा पहिला डाव 255 धावांवर संपुष्टात

मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा डाव 255 धावांवर संपुष्टात आला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 438 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजकडून कडवी टक्कर मिळाली, पण सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर विडिंजचा डाव 255 धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद सिराज याने वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत पाठवला. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने एकाकी झुंज दिली. ब्रेथवेट याने ७५ धावांची खेळी करत लढा दिला. 

 

[ad_2]

Related posts