[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या गोलंदाजीचा मजबूत आधारस्तंभ आणि आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, ‘मोहम्मद सिराजला वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.’ वनडे मालिकेतून विश्रांती दिल्यानंतर सिराज आता थेट भारतात परतणार असल्याचे वृत्त आहे. तो अश्विन, अजिंक्य रहाणे, नवदीप सैनी आणि केएस भरत यांसह उर्वरित कसोटी सहकाऱ्यांसह भारतात परतणार आहे.
सिराजला संघातून का वगळलं?
सिराजच्या वर्कलोड मॅनेजमेंटसाठी त्याला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी अन्य गोलंदाजाला अद्याप स्थान देण्यात आलेले नाही. अर्थात सिराजला विश्रांती देण्यात आली आहे पण मोहम्मद शमीही वनडे मालिकेचा भाग नसल्यामुळे संघाची वेगवान गोलंदाजी अचानक कमकुवत दिसू लागली आहे.
मोहम्मद सिराज गेल्या ८ महिन्यांपासून टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करत आहे. या गोलंदाजाने कमालीची कामगिरी केली आणि संघाला जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजला पहिल्या डावात २५५ धावांमध्ये ऑल आऊट करण्यात सिराजचा मोठा वाटा होता. या गोलंदाजाने ६० धावांत ५ विकेट घेतले. ही कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली पण सिराजला त्याच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच सामनावीराचा पुरस्कार मिळवण्यात यश आले.
भारताची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारीही वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेपासून सुरू होत आहे आणि, यामध्ये सिराज टीमचा महत्त्वाचा भाग असू शकतो. पण, विश्रांतीच्या नावाखाली त्याला संघातून वगळण्यात आले. यामागे भारताची नेमकी काय रणनिती आहे हे आता मालिका सुरू झाल्यानंतरचं कदाचित कळेल.
गेल्या ६ महिन्यांत, जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत, मोहम्मद सिराजने केवळ त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने संघात आपले स्थान पक्के केले नाही तर अनेक सामन्यांमध्ये टीम इंडियाला एकहाती विजय मिळवून दिला आहे. वनडे फॉरमॅटमध्ये नंबर वन गोलंदाज असलेल्या सिराजने आतापर्यंत २४ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने ४३ विकेट घेतल्या आहेत. ३२ धावांत ४ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
[ad_2]