Rohit Sharma S Hair Fall Indian Cricket Team Captain Loosing Hairs Rapidly Photos On Social Media Getting Viral

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rohit Sharma’s Hair Fall : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. आज दुसरा एकदिवसीय सामना होत आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 5 विकेटने विजय मिळवत 1-0 ने मालिकेत आघाडी घेतली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वीच रोहित शर्माचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतय. रोहित शर्माच्या डोक्यावरील केस कमी होत असल्याचं या फोटोत दिसत आहे. रोहित शर्माचा टक्कल पडत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. कर्णधारपदाच्या प्रेशरमुळे रोहित शर्माच्या डोक्यावरील केसं गळत आहेत का ? असा सवाल उपस्थित होतोय. 

रोहित शर्माचा फोटोंसोबत नेटकरी मिम्स तयार करत आहेत. काही जणांनी रोहित शर्माला हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला आहे. नेतृत्व करत असताना एखाद्या खेळाडूंची केस गळण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी अनेक खेळाडूंना हा सामना करावा लागला होता. धोनी आणि विराट कोहली नेतृत्व करत असताना त्यांची केस पांढरे झाले होते. विराट कोहलीनं कर्णधारपद सोडल्यानंतर अनुष्का शर्माने तसा उल्लेखही केला होता. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलिअर्स यालाही हेअरफॉलचा सामना करावा लागला होता. आता रोहित शर्माचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  
  

36 वर्षीय रोहित शर्मा मागील वर्षांपासून भारतीय संघाच्या तिन्ही प्रकारच्या संघाचा कर्णधार म्हणून काम पाहत आहे. कसोटी, वनडे आणि टी 20 मध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. कसोटीमध्ये भारतीय संघाने 1-0 च्या फरकाने विजय मिळवलाय. तीन सामन्याच्या वनडे मालिकेत भारतीय संघ 1-0 च्या फरकाने आघाडीवर आहे. आज दुसरा सामना होत आहे. या सामन्यापूर्वीच रोहित शर्माचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो कसोटीमधील असल्याचे दिसतेय. कर्णधारपदाच्या प्रेशरमुळे रोहित शर्माचे केस गळत आहेत, अशी चर्चा सुरु आहे.




[ad_2]

Related posts