West Indies Announces T20 Squad for WI vs IND T20 Series; वेस्ट इंडिजचं काय चाललंय? जुन्या खेळाडूंना संघात बोलावलं, भारताविरुद्ध टी-२० साठी अशी असेल टीम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. १५ सदस्यीय संघात नुकताच आपल्या फलंदाजीने सर्वांना चकित करणाऱ्या निकोलस पूरनच्या नावाचाही समावेश आहे. याशिवाय ओशन थॉमसही २ वर्षांनी संघात परतला आहे. त्याच वेळी, शे होप देखील टीमचा एक भाग आहे. या खेळाडूंच्या समावेशामुळे रोव्हमन पॉवेलच्या नेतृत्वाखालील संघाचा चेहरा मजबूत दिसत आहे. त्यामुळे टी-२० मालिकेतील विजयाचा मार्ग भारतासाठी सोपा नसेल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ५ सामन्यांची टी-२० मालिका ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिला सामना जिथे तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना खेळवला जाईल, तिथेच म्हणजे त्रिनिदादला होईल. पहिला टी-२० खेळल्यानंतर संघ गयानाला रवाना होईल, जिथे मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना खेळवला जाईल. तर टी-२० मालिकेतील शेवटचे दोन सामने १२ आणि १३ ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या भूमीवर खेळवले जातील.

निकोलस पूरनने आपण उपलब्ध होणार नसल्याचे सांगत एकदिवसीय संघाच्या निवडीपासून स्वत:ला दूर ठेवले. पण, टी-२० मालिकेत तो भारताविरुद्ध दहशत निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतासाठी धोकादायक गोष्ट म्हणजे पूरन अजूनही धमाकेदार फॉर्ममध्ये आहे. अमेरिकेच्या भूमीवर नुकत्याच पार पडलेल्या मेजर लीग क्रिकेटच्या फायनलमध्ये त्याने ५५ चेंडूत १३ षटकारांसह नाबाद १३७ धावांची खेळी करून आपल्या संघाला चॅम्पियन बनवले. तर अजून एक बाद म्हणजे शेवटचे दोन सामने अमेरिकेतच होणार आहेत.

पूरनप्रमाणेच जेसन होल्डरनेही हेच कारण सांगून एकदिवसीय मालिका सोडली. पण तो टी-२० मालिकेत खेळताना दिसणार आहे. होल्डरशिवाय ओशन थॉमस २ वर्षांनंतर परतणार आहे. थॉमसने त्याचा शेवटचा टी-२० सामना डिसेंबर २०२१ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. त्याचप्रमाणे फेब्रुवारी २०२२ मध्ये शेवटचा टी-२० सामना खेळलेला शे होप देखील या मालिकेत पुनरागमन करणार आहे.

टी-२० मालिकेत संघाचे कर्णधारपद रोव्हमन पॉवेलकडे असेल. त्याचबरोबर काईल मेयर्स उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. एकूणच, १५ सदस्यीय संघात संतुलन अचूक दिसत आहे. याचा अर्थ भारताला मोठे आव्हान मिळू शकते.

भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ:

रोवमन पॉवेल, काइल मेयर्स, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, ओशेन थॉमस, शाई होप, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, अकिल हुसेन, ओबेद मॅकको , ओडियन स्मिथ

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

[ad_2]

Related posts