Virat Kohli S Dedication Preparation For WTC 2023 As Soon As He Exits IPL 2023 Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Test Championship 2023 : टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपसाठी (WTC Final 2023) सज्ज होतोय. आयपीएलच्या (IPL 2023) प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्यास आरसीबी (RCB) ला अपयश आलं. त्यानंतर आता विराट कोहलीचं लक्ष्य  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपवर आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपला सुरुवात होणार आहे.  त्याआधी सराव आणि तयारीसाठी विराट कोहली  लंडनमध्ये दाखल होणार आहे. 

आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा 

विराटने यंदाच्या आयपीएलमध्येही खोऱ्याने धावा केल्या. 53.82 ची सरासरी आणि 140 च्या स्ट्राईक रेटने, विराटने दोन शतकं आणि 6 अर्धशतकांसह तब्बल 639 धावा कुटल्या. IPL 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.   

आरसीबी आयपीएल 2023 मधून बाहेर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आता आयपीएल 2023 (IPL 2023) मधून बाहेर पडली आहे. त्यामुळेच विराट कोहली (Virat Kohli) लवकरच लंडनमध्ये भारतीय संघाच्या (Team India) ताफ्यात दाखल होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची पहिली तुकडी आज, 23 मे रवाना होणार आहे.

टीम इंडियाची पहिली बॅच लंडनमध्ये दाखल होणार

भारतीय संघ तीन बॅचमध्ये लंडनमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. पहिली बॅच मंगळवारी म्हणजे आज रवाना होण्याची चिन्हं असून, कोहली दोन आठवडे सराव करणार आहे. पहिल्या बॅचमध्ये विराट कोहलीसह रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव हे प्रमुख खेळाडू असतील.

India vs Australia, WTC Final 2023 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

Team India : टीम इंडिया  

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , केएस भरत (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर,  मोहमद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव,  जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर) 

Team Australia : टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

[ad_2]

Related posts