Nissan New SUV Launch In India News In Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nissan New SUV : आजकाल भारतात अनेक नवनवीन गाड्या लाँच केल्या जात आहेत. अनेक आकर्षक फीचर्स (FEATURES) या गाड्यांमध्ये उपलब्ध आहेत. वाढत्या फीचर्समुळे या गाड्यांसाठी सगळ्यात जास्त मागणी असते. या कारणामुळेच या गाड्या ट्रेण्डिंगमध्ये असतात. आणि अशातच आता कार लव्हर्स साठी जपानी वाहन निर्माता कंपनी निसान (Nissan) मोटर्स भारतात लवकरच आपले फूल साईज एसयूवी एक्स ट्रेल (SUV X-TRAIL) माॅडेल लाँच करत आहे. याची किंमत पाहता बाकी गाड्यांचे माॅडेल्स मागे पडण्याची शक्यता आहे. या कार्समुळे अनेक इतर कार्सची मागणी कमी देखील होऊ शकते. या एसयूव्ही एक्स ट्रेल माॅडेल (SUV X-TRAIL) मध्ये आकर्षक फीचर्स उपलब्ध होणार आहे. सध्या भारतात एसयूव्ही सेगमेंट फाॅरच्युनरचा धबधबा आहे. ज्या माॅडेलला लोक खूप पसंती दर्शवत आहेत. परिणामी देशात याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. एमजी ग्लोस्टर आणि जीप मेरिडियन सारख्या कार या देशात असल्या तरी त्यांना टोयोटा फॉर्च्युनरसारखी लोकप्रियता नाही. पण आता एक्स-ट्रेलच्या आगमनाने फॉर्च्युनरला खडतर स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. मागच्या वर्षी निसानने तीन कार लॉन्च केल्या होत्या. ज्यामध्ये एक्स ट्रेल, कश्वाई आणि ज्यूक यांचा समावेश प्रामुख्याने होता. मात्र आता सर्वात पहिल्यांदा निसान एक्स ट्रेलाला लाँच करणार आहे.

पाॅवरट्रेन 

निसान सर्वात पहिले  एसयूव्ही ला SUV प्लॅटफाॅर्मवर तयार करणार आहे. याला CBU यूनिट म्हणून भारतात आणले जाईल. या एसयूव्हीच्या ग्लोबल यूनिटमध्ये 1.5 लिटर टर्बोचार्ड पेट्रोल इंजिन आहे.

सोबतच यामध्ये माईल्ड हायब्रिड आणि स्ट्राँग हायब्रिड याचे पर्याय उपलब्ध आहेत. याच्या माईल्ड हायब्रिड काॅन्फिगरेशन मध्ये 163 एचपीची पाॅवर आणि 300 न्यूटन मीटर टाॅर्क मिळतो.

ही कार केवळ 9.6 सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावते. या वाहनाचा कमाल वेग ताशी 200 किलोमीटर आहे. 

डिझाईन कसे असेल?

या एसयूव्ही माॅडेल मध्ये समोरच्या बाजूला एक मोठी V-मोशन फ्रंट ग्रिल, रॅपअराऊंड डिझाईन असलेले एलईडी DRL, वायपर्स आणि उच्च माऊंटेड स्टॉप LED हेडलॅम्प, मोठ्या चाकांच्या कमानी मसक्यूलर डिझाईन, LED टेललॅम्प आणि मागे मोठा बंपर आहे. 

फीचर्स

या SUV मधील वैशिष्ट्यांमध्ये प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम, एलईडी हेडलॅम्प, 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ट्राय-झोन क्लायमेट कंट्रोल, 
360-डिग्री कॅमेरा, 10.8-इंच हेड-अप डिस्प्ले, 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि बरेच काही समाविष्ट आहे.

ही बातमी वाचा

Manohar Joshi: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती खालावली, हिंदुजा रुग्णालयात दाखल

 

Car loan Information:
Calculate Car Loan EMI

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

[ad_2]

Related posts