[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याने कशी कामगिरी केली आहे ती निश्चितच काळजीचा विषय आहे. या उटल जेव्हा ते कर्णधार नव्हता तेव्हा मात्र कामगिरी चांगली झाल्याचे दिसते.
टीम इंडियातील स्टार ऑलराउंडर अशी हार्दिकची ओळख आहे आणि भविष्यातील कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळेच टी-२० मध्ये सातत्याने त्याला नेतृत्व करण्याची संधी दिली जात आहे. या संधीचा हार्दिकने फायदा देखील घेतला आहे आणि अनेक मोठ्या सामन्यात त्याने विजय मिळून दिले आहेत. पण दुसऱ्या बाजूला त्याच्या वैयक्तीक कामगिरीत मात्र मोठी घसरण झालेली दिसते.
हार्दिकने भारतासाठी आतापर्यंत १६ टी-२० सामन्यात नेतृत्व केले आहे. या लढतीत त्याने फक्त २९६ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ३० असून एकही अर्धशतक करता आले नाही. फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजीत देखील त्याने निराश कामगिरी केली आहे. या १६ सामन्यात हार्दिकने ४१ षटकात फक्त १२ विकेट घेतल्या आहेत.
कर्णधारपदाच्या आधी हार्दिकने ७६ सामन्यात १४४च्या स्ट्राइक रेटने १ हजार ५२ धावा केल्या आहेत. ७१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर ३ अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. ७३ चौकार आणि ५६ षटकार त्याने मारले आहेत. गोलंदाजीत १९७.४ षटकात त्याने ६१ विकेट घेतल्या आहेत. ३३ धावात ४ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
हार्दिकला २०२४ साली होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा कर्णधार करण्याचा विचार चर्चेत असताना त्याच्या या खराब कामगिरीने डोकेदुखी वाढवली आहे.
[ad_2]