Nicholas Pooran Shows His Bruises off Arshdeep Singh Bowling and Brandon King Shot in IND vs WI T20I Series Photos Viral: निकोलस पूरनला अर्शदीप सिंग आणि ब्रँडन किंगमुळे झाली दुखापत, स्वतः फोटो केले शेअर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

फ्लोरिडा: रविवारी फ्लोरिडा येथील लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियमवर भारत विरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात पूरनला मालिकावीराचा बहुमान देण्यात आला. या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा पराभव करत ३-२ अशा फरकाने मालिका जिंकली. या सामन्यानंतर निकोलस पूरनने त्याला झालेल्या दुखापतीबद्दल सर्वांना माहिती दिली. या सामन्यादरम्यान चेंडू त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी आदळला होता. यामुळेच त्याला झालेल्या जखमा त्याने दाखवून दिल्या आहेत.

पाचव्या टी-२० दरम्यान, फलंदाजी करताना एकदा नव्हे दोनदा निकोलसला चेंडू जोरदार लागला. एकदा नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभे असताना, ब्रॅंडन किंगने मारलेला फटका पूरनच्या डाव्या हाताला लागला. त्या चेंडूचा चांगलाच फटका त्याच्या हाताला बसल्याने झालेली दुखापत या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. तर दुसरा फटका त्याच्या पोटाला लागला. भारताच्या अर्शदीप सिंगने फेकलेल्या चेंडूने त्याच्या पोटावरही मार लागला होता. या फटक्याने झालेली जखमही आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे.
निकोलस पूरनने ट्विटद्वारे स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्याच्या जखमा दिसत आहेत. निकोलसने या जखमांसाठी ब्रॅंडन किंग आणि अर्शदीप सिंग या दोघांचे आभार मनात हसण्याचा इमोजी शेअर केला आहे. त्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. डाव्या हाताच्या फलंदाजाने दोनदा चेंडू जबर लागल्यानंतरही चांगली कामगिरी करत ३५ चेंडूत ४७ धावा करून वेस्ट इंडिजसाठी मालिका विजयाचा मार्ग निश्चित केला. १६६ धावांचा पाठलाग करताना पूरन आणि किंग यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी करून भारताला स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर काढले.

हार्दिकने पूरनला दिल होतं चॅलेंज, आधी मैदानात २ षटकार मारले अन् आता इंस्टाग्रामवर घेतला बदला

२००६ नंतर वेस्ट इंडिजच्या भारताविरुद्धच्या पहिल्या द्विपक्षीय मालिकेत पूरनने महत्त्वाची भूमिका बजावली. प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेण्यासाठी तो उपस्थित नव्हता कारण त्याला फ्लाइट पकडायची होती. पूरनने पाच सामन्यांमध्ये १४१.९४ च्या स्ट्राइक रेटने १७६ धावा केल्या.

[ad_2]

Related posts