[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड हा भारतीय संघात आहे. पहिल्या टी-२० सामन्यात ऋतुराजने दमदार कामगिरी केली होती. कारण पहिल्या सामन्यात तो सलामीला आला आणि नाबाद राहीला होता. त्यामुळे त्याच्याकडून आता दुसऱ्या सामन्यात मोठी अपेक्षा असेल. पण आता ऋतुराजबरोबर महाराष्ट्राचा अजून एक खेळाडू दुसऱ्या टी-२० सामन्यात मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात आता महाराष्ट्राचा यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज जितेश शर्माला संधी मिळणार असल्याचे समजते आहे. जितेश शर्मानं विदर्भ क्रिकेट असोसिएशनचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. जितेश शर्माला मुंबईच्या टीमनं २०१६ मध्ये खरेदी केलं होतं. २०१६ ते २०१८ हे तीन हंगाम तो राखीव खेळाडू म्हणून संघात होता. पण, त्याला प्रत्यक्ष मैदानावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नव्हती. मुंबईनं त्याला नंतर करारमुक्त केलं. त्याच जितेश शर्माला पंजाब किंग्जनं संधी दिली. जितेश शर्मानं मिळालेल्या संधीचं यंदाच्या हंगामात सोनं करुन दाखवलं आहे. जितेश शर्मा मुंबई विरुद्धच्या सामन्यात १२ व्या ओव्हरमध्ये मैदानात उतरला. लियाम लिविंगस्टोनच्या साथीनं त्यानं मुंबईला घाम फोडला. जितेशनं त्याच्या वादळी खेळीत २७ बॉलमध्ये २ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ४९ धावा केल्या होत्या. त्यामुळे टी-२० क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे आणि त्याच्यासाठी आयर्लंडचा दौरा हे एक चांगले व्यासपीठ असणार आहे. त्यामुळे जितेशसाठी हा दौरा महत्वाचा असेल. पण जर जितेशला संघात स्थान द्यायचे असेल तर कोणाला संघाबाहेर करायचे, हा निर्णय आता जसप्रीत बुमराला घ्यावा लागणार आहे.
भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना हा रविवारी रंगणार आहे. या सामन्यात आता जितेश शर्माला संधी मिळते की नाही, याची उत्सुकता सर्वांना असेल.
[ad_2]