[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
जेव्हा कुटुंबीयांनी तिची कबर खोदली आणि तिची शवपेटी तोडली, तेव्हा त्यांना रोसांगेला ही निर्जीव आढळून आली. मात्र, तिची अवस्था पाहता तिला चुकून जिवंत गाडले गेले असावं, असं त्यांना वाटलं.
मिळालेल्या माहितीनुसार, असं सांगितलं जात आहे की ही महिला ११ दिवस या शवपेटीत बेशुद्ध पडून होती. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिने यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असावा. कारण, तिच्या शवपेटीत सर्वत्र रक्त होतं, शरीरावर जखमा होत्या.
३७ वर्षीय रोसांगेला अल्मेडा बाहेर पडण्यासाठी धडपडत असताना ती किंचाळली असावी. यादरम्यान, शवपेटी फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या मनगटावर दुखापत झाली. ईशान्य ब्राझीलमधील रियाचाओ दास नेवेसच्या स्मशानभूमीत ही सारी घटना घडली. रोसांगेला कबरीतून बाहेर काढण्यात आलं तेव्हा तिच्या शवपेटीमध्ये रक्त आढळले.
या प्रकरणाचा एक व्हिडिओही समोर आलाय, त्यामध्ये तिथे उपस्थित लोक रोसांगेलाला शवपेटीतून बाहेर काढत आहेत आणि काही लोक रुग्णवाहिका बोलवण्यास सांगत आहेत. उपस्थितांपैकी काहींनी तिच्या पायाला स्पर्श करुन पाहिला तर त्यांना तिचे पाय गरम आढळले. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिला पुरण्यात आले.
स्मशानभूमीजवळ राहणाऱ्या लोकांना रोसांगेलाला पुरल्याच्या ११ दिवसांनंतर तिच्या कबरीतून आवाज येत असल्याचं तिच्या कुटुंबीयांना सांगितलं होतं. महिलेच्या हातावर आणि कपाळावर जखमा होत्या, ज्यामुळे तिने शवपेटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत होते. महिलेच्या कानातील आणि नाकातील कापूसही शरीरापासून वेगळा पडलेला होता.
[ad_2]